
गणेश शेंडे घूगूस 9764890809 – घुगूस शहरातील प्रतिष्ठित व सामाजिक कार्यकर्ते व तसेच महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ शाखा चे घूगूस चे अध्यक्ष श्रीमान सुरेश जी खडसे साहेब यांचा संत श्री साईबाबा बहुद्देशीय संस्था तर्फे अमिषा लेडीज कलेक्शन घुगुस येथे जाऊन संस्थेचे अध्यक्ष गणेश शेंडे व त्यांच्या संस्थेच्या पदाधिकाऱ्या तर्फे शाल श्रीफळ देऊन व पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला.
पत्रकार तथा सामाजिक कार्यकर्ते सुरेश खडसे यांनी दिनांक 11 6 2025 रोजी चंद्रपूर वैद्यकीय महाविद्यालय येथील शरीर रचना शास्त्र विभागात जाऊन मरणोत्तर देह दान करण्याची कागदोपत्री कारवाई पूर्ण करून प्रमाणपत्र मिळवून घेतले व समाजाच्या कामी पडायचं समाजाला एक उत्कृष्ट डॉक्टर मिळावा म्हणून खडसे यांनी आपला देहदान करायचा हा संकल्प पूर्ण केला या कार्याची दखल घेऊन संत श्री. साईबाबा बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने आज दिनांक १३,६,२०२५ ला सुरेश खडसे यांचा सत्कार करण्यात आला याप्रसंगी संत श्री साईबाबा बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष गणेश शेंडे उपाध्यक्ष गणेशजी वजे सहसचिव श्रीकांत पतंरगे सामाजिक कार्यकर्ते बबलू कुरेशी, जांभुळकर, वेदोजी मदने केळवत हे सर्व उपस्थित होते















