
तिरुमलेश कंबलवार, गडचिरोली प्रतिनिधी – गडचिरोली : उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान तालुका अभियान व्यवस्थापन कक्ष पंचायत समिती एटापल्ली अंतर्गत महादेव महिला प्रभाग संघाची वार्षिक सर्वसाधारण सभा शुकवार, १३ जुन 2025 रोजी पार पडली. या सभेला सभेचे अध्यक्ष शोभा राकेट दुर्गे सचिव राजेश्वरी रमेश मट्टामी, बर्डे सर (BMM) तालुका अभियान व्यवस्थापन कक्ष एटापल्ली,चे तालुका अभियान व्यवस्थापक श्री. मा बर्डे सर शेख सर (BM MIS), घटे सर( BM Fi ) प्रभागाचे प्रभाग समन्व्यक अनिल भसारकर प्रमुख पाहुणे म्हणून भसारकर मॅडम उपस्थित होते.
सभेच्या सुरुवातीला डॉ. बाबासाहेब आंबेडकर,सावित्रीबाई फुले वीर बिरसामुंडा यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. सभेचे अध्यक्ष शोभा राकेट दुर्गे, सचिव राजेश्वरी रमेश मट्टामी यांनी बचत गटामार्फत महिलाशक्तीकरण करण्यासाठी राबविण्यात येत असलेल्या विविध उद्योगासाठी आर्थिक सहाय्य योजनांची माहिती महिलांना दिली. ही सभा महादेव महिला प्रभाग संघाच्या अध्यक्ष जयाताई सडमेक यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. त्यांनी प्रभाग संघ कसा काम करत आहे, आर्थिक उलाढाल, भविष्यातील नियोजन स्पष्ट केले. सभे दरम्यान 2024-25 या वर्षात झालेल्या आर्थिक उलाढाली बाबतचे अहवाल वाचन प्रभाग लेखापाल राजेश्वरी नक्कलवार यांनी केले. तसेच गुट्टा – उडेरा प्रभाग समन्वयक भसारकर सर यांनी मागील दहा वर्षात एटापल्ली तालुक्यातील महादेव महिला प्रभाग संघ गट्टा – उडेरा प्रभाग संघात उमेद कसे काम करीत आहे हे स्पष्ट केले. अनेक योजनाबद्दल माहिती, तसेच योजनांचा महिलांनी लाभ घेतला तर महिला सक्षमीकरण चांगल्या प्रकारे होऊ शकते. उपजीविका, किचन गार्डन. लखपती दीदी, आरोग्य, शिक्षण या सर्व माहिती हे त्यांनी स्पष्ट केले.

सभेमध्ये सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात आले. यात एकल नृत्य, सामूहिक नृत्य, गीत गायन, रांगोळी स्पर्धा, संगीत खुर्ची, या स्पर्धांचाही समावेश होता. सभेचे अध्यक्ष शोभा दुर्गे यांच्या हस्ते स्पर्धकांना स्मृती चिन्ह वितरीत करण्यात आले. या सभेला उमेद अभियानाचे तालुका अभियान व्यवस्थापक बर्डे सर, शेख सर, घटे सर प्रभाग संघाच्या सचिव बेबी तलांडे कोषाध्यक्ष गिता मट्टामी उपस्थित होत्या. सभेचे सूत्रसंचालन बंडू वाडके( cfm) सर यांनी केले. प्रास्ताविक राजेश्वरी नक्कलवार यांनी केले. तर आभार प्रदर्शन अमृता कोल्हावार यांनी केले. या सभेला ग्रामसंघाचे पदाधिकारी सर्व महिला सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.
टिप :-
महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान उमेद अभियानामार्फत वार्षिक सर्वसाधारण सभेचे आयोजन हेडरी येथे करण्यात आले… सभेचे सचिव राजेश्वरी मट्टामी गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासी मातृभाषा म्हणून ओळखली जाणारी (माडिया) या भाषेत महिलांना नविन योजना बदल स्पष्ट पणे मार्गदर्शन केली….















