prabodhini news logo
Home चंद्रपूर सामाजिक बांधिलकी जपत सर्वसामान्यांच्या मनात आपलं एक वेगळं स्थान निर्माण करणारे उभरतं...

सामाजिक बांधिलकी जपत सर्वसामान्यांच्या मनात आपलं एक वेगळं स्थान निर्माण करणारे उभरतं युवा नेतृत्व विशाल निंबाळकर यांचा वाढदिवस उत्साहात साजरा

2
241

नम्रता सरदार मुख्य संपादिका प्रबोधिनी न्युज – कार्यकुशल विकासाभिमुख युवा नेतृत्व माजी नगरसेवक, भारतीय जनता युवा मोर्चा चंद्रपूर जिल्हाध्यक्ष विशाल निंबाळकर यांचा वाढदिवस 20 जून रोजी चंद्रपूर महानगरात विविध सेवाभावी उपक्रमातून साजरा करण्यात आला अशी माहिती युवा मोर्चा युवती अध्यक्ष मुग्धा खांडे यांनी दिली.

विशाल निंबाळकर हे विकासाची दूरदृष्टी असलेले आणि सर्वसामान्यांशी नाळ जोडलेले लोकप्रिय नेतृत्व म्हणून ओळखले जातात.
विविध ठिकाणी त्यांचे कार्यकर्ते आणि चाहते यांनी भाऊंचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा केला.
रक्तदान, अन्नदान, आरोग्य तपासणी, समाजातील गुणवंतांचा सत्कार, स्वच्छता मोहीम, वृक्षारोपण, फळवाटप, गरजूंना रेनकोट व छत्री वाटप, फेरीवाल्यांना येणाऱ्या पावसाळ्यात त्रास होऊ नये या दृष्टीने मोठ्या छत्र्यांचे वाटप, अशा समाजाला उपयुक्त ठरणाऱ्या कार्यक्रमांचे आयोजन भारतीय जनता युवा मोर्चा आणि विशाल भाऊ मित्र परिवार तर्फे करण्यात आले.
शहरातील नागरिकां द्वारे विविध संघटनांद्वारे विशाल भाऊंना त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या उज्वल भविष्यासाठी शुभकामना देण्यात आल्या.

2 COMMENTS

  1. विशाल भाऊ आपणास वाढदिवसाच्या अनंत कोटी शुभेच्छा 💐💐

Leave a Reply to Mugdha Tarun Khande Cancel reply

Please enter your comment!
Please enter your name here