prabodhini news logo
Home ठळक बातम्या श्री. क्षेत्र आरडगांव ते श्री. क्षेत्र पंढरपूर पायी दिंडी सोहळा

श्री. क्षेत्र आरडगांव ते श्री. क्षेत्र पंढरपूर पायी दिंडी सोहळा

0
107

संगीता खिलारी अहिल्या नगर प्रतिनिधी – सच्चिदानंद वै. सुखनिवासी श्री. संत श्रीपादबाबा व श्री. संत रामदास बाबा यांच्या कृपाशीर्वादाने तसेच ह.भ.प. योगिता महाराज शेळके यांचे कुशल मार्गदर्शनाखाली व समस्त ग्रामस्थ आरडगाव भजनी मंडळाच्या सहकार्याने आरडगाव ते पंढरपूर पायी दिंडी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.
२५जून ते ०७ जुलै २०२५ पर्यंत हा भक्तिमय पायी दिंडी सोहळा होत आहे. दिंडीचे १५ वे वर्ष असून सर्व गावकरी व भाविक भक्तांनी सहभागी होऊन दिंडीचे प्रस्थान झाले आहे.
आज सकाळी दरेवाडी फाटा वारकऱ्यांना नाश्ता व चहापान देऊन दिंडी पुढे मार्गस्थ करण्यात आली आहे.
यावेळी अनिल करांडे, गणेश तोडमल, अशोक सांगळे, संजय भिंगारदिवे,छोटू शिंदे,दत्तू बेरड, विजय बेरड,विजू उमाप, अमितबाबा बेरड, बाबा भिंगारदिवे, राजू सुर्यवंशी, गुलाब गवळी, बाळासाहेब राहिंज इत्यादी भाविक भक्त व वारकरी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here