prabodhini news logo
Home क्राईम अल्पवयीन मुलीवर अत्याचार; ३ आरोपी पोलीसाच्या ताब्यात

अल्पवयीन मुलीवर अत्याचार; ३ आरोपी पोलीसाच्या ताब्यात

0
135

चंद्रपूर : अल्पवयीन मुलीवरील अत्याचार व व्हिडिओ प्रसारण प्रकरणी शेगाव पोलीस स्टेशन येथे गंभीर गुन्हा दाखल करण्यात आला असून ३ आरोपींना अटक करण्यात आली आहे.
आज दुपारी १:३० ते २:०० वाजताच्या दरम्यान पीडित मुलगी व तिच्या वडिलांनी पोलीस ठाण्यात येऊन तक्रार दाखल केली की, दिनांक २४ मे २०२५ रोजी तिच्यावर अत्याचार करण्यात आला असून त्या घटनेचे व्हिडिओ तयार करून सोशल मीडियावर प्रसारित करण्यात आले आहेत. Chandrapur Crime
तक्रारीची गंभीर दखल घेत, शेगाव पोलिसांनी तात्काळ तपास सुरू करून तीन आरोपींना अटक केली आहे. याप्रकरणी भारतीय न्याय संहिता २०२३ अंतर्गत कलम ७०(२), १२३, तसेच पोक्सो कायदा कलम ४, ६ आणि माहिती व तंत्रज्ञान अधिनियम अंतर्गत कलम ६६(ई), ६७(अ) अन्वये गुन्हा दाखल केला आहे.
गुन्ह्याच्या तपासासाठी वरिष्ठ पोलीस अधिकारी स्वतः घटनास्थळी पोहोचले असून, उपविभागीय पोलीस अधिकारी राकेश जाधव व चिमुर उपविभागीय अधिकारी यांच्याकडे तपासाची जबाबदारी देण्यात आली आहे.
पोलीस प्रशासनाने नागरिकांना आवाहन केले आहे की, या प्रकरणाशी संबंधित कोणताही फोटो किंवा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रसारित करू नये. असे केल्यास संबंधितांविरुद्ध कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here