
नम्रता सरदार मुख्य संपादिका प्रबोधिनी न्युज – चंद्रपूर : महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ नागपूर विभाग गट कार्यालय चंद्रपूर अंतर्गत ललित कलाभवन बंगाली कॅम्प चंद्रपूर येथे दिनांक ११ जुलैला जागतिक लोकसंख्या दिनानिमित्त कामगार व कामगार कुटुंबीय ५ सुखी जोडप्यांचा सत्कार समारंभ व व्याख्यान मा. प्रतिभा भाकरे मॅडम प्र.सहाय्यक कल्याण आयुक्त, नागपुर यांच्या मार्गदर्शना खाली कार्यक्रम संपन्न झाला.
सदरच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मा. किसन नागरकर विश्वकर्मा गुणवंत कामगार पुरस्कारप्राप्त महापारेषण कर्मचारी तसेच उपाध्यक्ष नाते आपुलकीचे संस्थेचे, अध्यक्ष नाते रक्ताचे संस्थेचे, प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले मा. दत्ता बावणे वाहतुक नियंत्रक, चंद्रपूर , तथा प्रादेशिक सचिव महाराष्ट्र एसटी कामगार संघटना नागपूर प्रदेश, कार्यक्रमाच्या व्याख्यात्या मा.भुवनेश्वरी धर्मपुरीवार शिक्षिका सावित्रीबाई फुले विद्यालय गडचांदूर ,मा. डॉ.रेश्मा सोरदे जनरल फिजिशियन चंद्रपूर यांची उपस्थिती होती.

यावेळी व्याख्याते यांनी जागतिक लोकसंख्या दिनाचे महत्व सर्वांना समजावून सांगितले.
कामगार व कामगार कुटुंबीय सुखी जोडपे कामगार कल्याण केंद्र बल्लारपूर येथील पेपर मिल कामगार जितेंद्र कान्हा भोयर, कामगार कल्याण केंद्र हिंगणघाट येथील योगेश रमेशराव बोरकर Pee vee text मिल, कामगार कल्याण केंद्र, वर्धा येथील प्रफुल बाबाराव येसनकर कामगार कल्याण केंद्र गडचिरोली येथील रघुनाथ राजेश्वर नेवारे एसटी महामंडळ गडचिरोली, कामगार कल्याण केंद्र ऊर्जानगर येथील सुयोग तुळशीराम व-हाटे महानिर्मिती चंद्रपूर यांचा शाल, श्रीफळ ,पुष्पगुच्छ व नगद राशी रु.५०००/- मान्यवरांच्या हस्ते देऊन सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक रामेश्वर हरिश्चंद्र अळणे कामगार कल्याण अधिकारी चंद्रपूर यांनी तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन देवेंद्र दत्त कल्याण निरीक्षक ललित कला भवन बंगाली कॅम्प, चंद्रपूर यांनी केले .कार्यक्रमाला बहुसंख्येने गट कार्यालयातील कर्मचारी व केंद्र सभासद परिसरातील नागरिक कामगार /कामगार कुटुंबीय मोठ्या संख्येने उपस्थित होते असे देवराव कोंडेकर गुणवंत कामगार यांनी कळविले आहे.















