prabodhini news logo
Home ठळक बातम्या शिवश्री प्रवीण गायकवाड यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा परळी येथे जाहीर निषेध

शिवश्री प्रवीण गायकवाड यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा परळी येथे जाहीर निषेध

0
235

परळी प्रतिनिधी प्रबोधिनी न्युज नेटवर्क – संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांच्यावर अक्कलकोट येथे भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी दीपक काटे यांच्यासह इतरांनी केलेल्या हल्ल्याचा परळी येथे निषेध करण्यात आला. पुरोगामी चळवळीचे नेते तसेच महाराष्ट्राला या संघटनेने दंगलमुक्त केले हजारो तरुणांचे मस्तक सशक्त करून त्यांच्या हातातील लाठ्या-काठ्या काढून त्यांच्या हाताला उद्योगधंदे, लेखणी पेन्सिल, देणारे हजारो तरुणांना विदेशामध्ये उद्योग धंद्यासाठी व नोकरीसाठी पाठवणारे संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांच्यावर हा हल्ला नसून तो पुरोगामी चळवळीवर हल्ला झाला आहे. महाराष्ट्र राज्यासाठी योगदान असलेल्या अनेक लोकांवर सातत्याने होत असलेल्या हल्ल्याच्या अनुषंगाने महाराष्ट्राला अस्थिर करण्याचे षडयंत्र विशिष्ट प्रवृत्तीचे लोक करत आहेत. म्हणून राज्य सरकार व गृहमंत्री हे अपयशी ठरले आहेत. या प्रकरणांमध्ये गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यावा व या हल्लेखोरांवर कायद्याअंतर्गत कारवाई करावी. अशी मागणी निषेध करते वेळी करण्यात आली. या प्रसंगी मिलिंद घाडगे, सेवकराम जाधव, देवराव लुगडे महाराज, नितीन शिंदे, विश्वनाथ गायकवाड, मोहसीन शेख, शिवाजीराव देशमुख, यशवंत सोनवणे केशवराव मुंडे, दिनेशराव गजमल,गौतम साळवे, ॲड अर्जुन सोळंके, प्रकाश मुंडे, अल्ताफ भाई, केशव कांबळे, राजेभाऊ सोळंके, हनुमान दिवटे, विजयकुमार कस्तुरे यांच्यासह सामाजिक, राजकीय क्षेत्रातील पुरोगामी विचाराचे मान्यवर उपस्थिती होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here