prabodhini news logo
Home गोंदिया किरसान इंटरनॅशनल पब्लिक स्कूल तथा किरसान इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट येथे खासदार डॉ.नामदेव...

किरसान इंटरनॅशनल पब्लिक स्कूल तथा किरसान इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट येथे खासदार डॉ.नामदेव किरसान यांचा वाढदिवस साजरा

0
169

नम्रता सरदार मुख्य संपादिका प्रबोधिनी न्युज – किरसान इंटरनॅशनल पब्लिक स्कूल व किरसान इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट गणखेरा जि.गोदिया येथे शाळेच्या सभागृहात संस्थेचे अध्यक्ष तथा गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्राचे लोकप्रिय खासदार डॉ. नामदेव किरसान यांचा वाढदिवस उत्साहात साजरा करण्यात आला. शाळेतील विद्यार्थ्यांनी त्यांचे स्वागत करण्यासाठी वाढदिवसाची गाणी आणि नृत्य सादर करून सर्वांना मंत्रमुग्ध केले. शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती राखी वरल्यानी आणि शिक्षकांनी खासदार डॉ. नामदेव किरसान यांना केक भरवुन पुष्पगुच्छ देऊन वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या. तसेच त्यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.
यावेळी महासचिव जिल्हा काँग्रेस कमिटी गोंदिया रामसिंग चौहान, सचिव जिल्हा काँग्रेस कमिटी गोंदिया इसुलाल भालेकर, संस्था संचालक अ‍ॅड. दुष्यंत किरसान, सिमा दुष्यंत किरसान, मुख्याध्यापिका राखी वरल्यानी, प्राचार्य एम.बी.ए. कॉलेज दिलीप कोल्हे, सीमा चंद्रिकापुरे, देवेश्वरी राणे, अनिता श्रीपात्रे, लता डोळे, माधुरी रहांगडाले, मंगला पटले, रियाताई चौधरी, लिकेश कोल्हे, सागर राऊत, कांचन कटरे, साक्षी रांहागडाले, मेघा कांबळे, मीना चौधरी, सविता चीचाने, निहाल मेश्राम, विनिता चौरेवार, सौरभ वरवाडे, विनोद देशमुख, कीर्तेस्वर बावनकर, सागर राऊत, सुभाष चूलपार, गिरीश गावराने कर्मचारी, शिक्षक वृंद, विद्यार्थी व विद्यार्थिनी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here