prabodhini news logo
Home चंद्रपूर महर्षी वाल्मिकी बचत गटाच्या वतीने सन्मानीय तुकड्यादास चाचरकर मुख्याध्यापक यांचा सेवानिवृत्तीपर कृतज्ञता...

महर्षी वाल्मिकी बचत गटाच्या वतीने सन्मानीय तुकड्यादास चाचरकर मुख्याध्यापक यांचा सेवानिवृत्तीपर कृतज्ञता गौरव सोहळा संपन्न

0
96

ब्रम्हपुरी प्रतिनिधी प्रबोधिनी न्युज नेटवर्क – ब्रम्हपुरी – येथील महर्षी वाल्मिकी पुरुष व महिला बचत गटाच्या वतीने मासिक सभेचे औचित्य साधून स्थानिक डॉ बाबासाहेब आंबेडकर विद्यालय ब्रम्हपुरी येथील नुकतेच ३० जुनला वयोमानानुसार सेवानिवृत्त झालेले सन्मानीय मुख्याध्यापक श्री.तुकड्यादासजी चाचरकर यांचा सेवानिवृत्तीपर कृतज्ञता गौरव सोहळा दिनांक २० जूलै रोज रविवारला गणेश भानारकर आरोप्लांट यांच्या निवासस्थळी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
जुलै महिन्याच्या मासिक सभेचे आयोजन रविंद्र अलगदेवे व प्रमोद दिघोरे यांच्या सयुक्त अध्यक्षतेखाली कार्यक्रमाचे आयोजीत करण्यात आले होते. श्री. तुकड्यादासजी चाचरकर हे बचत गटाचे सदस्य असून ते ब्रम्हपुरी येथील नामांकित डॉ.बाबासाहेब आंबेडकर विद्यालयात १९८६ पासून प्राथमिक शिक्षक या पदावर रुजू होऊन पुढील अविरत शिक्षण प्राप्त करुन इंग्रजी विषयाचे अध्यापन ते मुख्याध्यापक पदापर्यंत यशस्वीपणे जबाबदारी सांभाळून हजारो विद्यार्थ्यांचे भवितव्य घडवून दिनांक ३० जून २०२५ रोजी ३९ वर्षे प्रदीर्घ दिलेल्या सेवेतून सेवानिवृत्त झाले. त्यांच्या या योगदान बद्दल सेवानिवृत्तीपर कृतज्ञता गौरव सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी महर्षी वाल्मिकी पुरुष व महिला बचत गट ब्रम्हपुरीच्या वतीने बचत गटाचे विद्यमान अध्यक्ष श्री.चांदेकर यांच्या हस्ते शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ व भेटवस्तू देऊन त्यांचा सपत्नीक स्वागत व सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी प्रभुजी वाघधरे, रविंद्र अलगदेवे, चांदेकर यांनी आपले मनोगत व्यक्त केले. सदर कार्यक्रमात बचत गटातील सदस्य अनिल पचारे,अमोल भानारकर,हरीश कामडी,संदिप भानारकर, सुरेश दिघोरे, कालीदास कामडी, व्यंकटजी चाचरकर, प्रविण चाचेरे, आनंद शिऊरकर, मनोहर मेश्राम,मुकेश भानारकर, संजय दिघोरे,विजय दिघोरे, विलास भानारकर,लक्ष्मण शेंडे, मनोहर मेश्राम, तथा महिला व पुरुष गटातील सर्व महिला सदस्यगण यांच्या साक्षीने हा कार्यक्रम यशस्वी करण्यात आला.
कार्यक्रमाचे संचालन प्रमोद दिघोरे सर यांनी केले तर आभार अलगदेवे सर यांनी व्यक्त केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here