
तालुका प्रतिनिधी अहेरी विवेक मिरालवार 8830554583 – आज दि.26 07 2025 रोजी आल्लापल्ली येथे मुसळधार पावसाने अनेक घरांत पाणी गेले व जन जीवन विस्कळीत झाले.आल्लापल्ली येथील जिल्हा परिषद मुलाची प्राथमिक शाळा जवळ (फुकट नगर) या वसाहती मध्ये संपूर्ण पाणी प्रत्येकाच्या घरात शिरले संपूर्ण कुटुंबाचे घर हे जलमय झाले आणि त्यांचे जनजीवन संपूर्ण पने विस्कळीत होऊन रस्त्यावर उभे होते.
या संपूर्ण घटना क्रमाची ची माहिती मा.अजय कंकडालवार (मा.जि.प.अध्यक्ष) आणि मा. हनमंतू मडावी (जिल्हा अध्यक्ष आदिवासी सेल) यांना मिळताच त्यांनी लगेच आपल्या निकट वर्तिय कार्यकर्ता मा. अज्जू पठाण (माजी सरपंच ग्रा. पं.आल्लापल्ली) यांना फोन करून त्या वस्तीतील कुटुंबाची सद्य स्थितीत पुनर्वसन करून द्यावे व योग्य असे नियोजन करून द्यावे.असा आदेश एकताच मा.अज्जू भाऊ पठाण यांनी आपल्या कार्यकर्ता समवेत घटना स्थळी गाठून संपूर्ण कुटुंबाची जिल्हा परिषद मुलांची प्राथमिक शाळा, आल्लापल्ली येथे व्यवस्था करून त्यांचं राहण्याची व जेवण्याची व्यवस्था करून दिली.त्यांचा सोबत काँग्रेस आविस कार्यकर्ता प्रशांत सरकाटे, विशाल तोडसाम,जावेद शेख,इत्यादी कार्यकर्ता समेत संपूर्ण कुटुंबाची पुनर्वसन करून देण्यात आले.















