prabodhini news logo
Home चंद्रपूर राखीचा धागा – भावनिक नात्याचे, आदर आणि जबाबदारीचे प्रतीक – आ. किशोर...

राखीचा धागा – भावनिक नात्याचे, आदर आणि जबाबदारीचे प्रतीक – आ. किशोर जोरगेवार

0
91

गुरुदेव सेवा समिती महिला मंडळाच्या वतीने रक्षाबंधन कार्यक्रमाचे आयोजन

प्रणाली येरपुडे विशेष तालुका प्रतिनिधी चंद्रपूर – आज असंख्य बहिणींनी माझ्या हातावर राखी बांधून प्रेम, आपुलकी आणि स्नेहाचा हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला. प्रत्येक राखीत मला बहिणींच्या मनातील माया, विश्वास आणि आपल्या नात्यातील अढळ बांधिलकीची अनुभूती झाली. हे नाते केवळ धाग्याचे नसून, भावनिक नात्याचे, परस्पर आदराचे आणि बहिणींप्रती भावाच्या जबाबदारीचे प्रतीक असल्याचे प्रतिपादन आमदार किशोर जोरगेवार यांनी केले.
गुरुदेव सेवा समितीच्या महिला मंडळाच्या वतीने चैतन्य ज्येष्ठ नागरिक संघ येथे रक्षाबंधन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी आमदार किशोर जोरगेवार बोलत होते. कार्यक्रमाला ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष अशोक संगिडवार, भारतीय जनता पक्षाचे महानगर अध्यक्ष सुभाष कासनगोट्टूवार, पुरुषोत्तम राऊत, बबन मत्ते, टिपले, मंडळ अध्यक्ष स्वप्नील डुकरे, मंजुश्री कासनगोट्टूवार, कल्पना गिरडकर, नकुल वासमवार, चंदा ईटनकर आदी मान्यवरांची मंचावर उपस्थिती होती.
यावेळी पुढे बोलताना आ. जोरगेवार म्हणाले की, आज रक्षाबंधनाच्या या पवित्र पर्वानिमित्त चंद्रपूर महिला गुरुदेव सेवा मंडळातर्फे आयोजित या भव्य कार्यक्रमात सहभागी होण्याचा मला आनंद आहे. या सुंदर आणि भावनिक क्षणांचे साक्षीदार होणे, हे माझ्यासाठी केवळ सन्मानच नाही तर जीवनभर जपून ठेवावा असा एक अमूल्य ठेवा आहे. मंडळाच्या सर्व महिला सदस्यांनी घेतलेला सक्रिय सहभाग आणि कार्यक्रमातील उत्साहामुळे सणाचा आनंद द्विगुणित झाला आहे. आपल्याकडून मिळालेल्या या प्रेमाच्या उबेने माझ्या आयुष्याला नेहमीच नवे बळ, नवी प्रेरणा आणि लोकसेवेची निष्ठा मिळत राहील.
या प्रसंगी आपण सर्वांच्या वतीने राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांना देखील राखी पाठवली आहे. हा भावनिक संदेश नक्कीच आपल्या बहिणींच्या प्रेमाचा आणि आपल्या संस्कृतीतील स्नेहबंधाचा गौरव वाढवणारा आहे. असे ते म्हणाले. या कार्यक्रमाला गुरुदेव सेवा मंडळाच्या महिलांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here