
प्रणाली येरपुडे विशेष तालुका प्रतिनिधी चंद्रपूर – चंद्रपूर शहरात बुद्धिष्ट मंगल परिणय ग्रुप, नागपूर यांच्या वतीने राज्यस्तरीय वधू-वर बौद्ध धम्म परिचय मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. या मेळाव्यात राज्यभरातील अनेक वधू-वरांनी सहभाग नोंदवून एकमेकांना ओळख करून घेतली व बौद्ध धम्माच्या तत्त्वज्ञानावर चर्चा करण्यात आली.
या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून श्रीकांत हस्ते, पुष्पलता ढोबळे (नागपूर), प्रमोद सोमकुंवर, प्रशांत रामटेके, सुषमा सोमकुंवर आणि वैशाली यांची उपस्थित होती. पाहुण्यांनी बौद्ध धर्माच्या सामाजिक आणि सांस्कृतिक महत्त्वावर मार्गदर्शन केले. उपस्थितांनी या उपक्रमाचे कौतुक करत भविष्यात अशा मेळाव्यांचे नियमित आयोजन करण्याची अपेक्षा व्यक्त केली.















