
चंद्रपूर, १९ ऑगस्ट –पडोली येथील इंदिरा नगरात घडलेल्या दुर्दैवी घटनेत मोकाट गायीच्या हल्ल्यात एका महिलेचा जागीच मृत्यू झाला तर २ महिला गंभीर जखमी झाल्या आहेत.
स्थानिक नागरिकांनी गायीच्या मालकाच्या निष्काळजीपणाला जबाबदार धरले असून परिसरात भीती व संतापाचे वातावरण आहे.
या प्रकरणात NSUI चंद्रपूर तर्फे पडोली पोलीस ठाण्यात निवेदन देण्यात आले.
या वेळी जिल्हाध्यक्ष शफक शेख, तालुकाध्यक्ष संजू कुमार ग्वालवंशी व तालुकासचिव प्रमोद शेंडे उपस्थित होते.
NSUI ची मागणी :
गायीच्या मालकावर फौजदारी गुन्हा दाखल करावा.
मृतकाच्या कुटुंबियांना व जखमींना तातडीने आर्थिक मदत द्यावी.
मोकाट जनावरांवर कायमस्वरूपी नियंत्रणासाठी उपाययोजना करावी.
एनएसयूआयच्या विनंतीनंतर, पडोली परिसरातील सर्व गौ पालक आणि गाय मालकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पडोली पुलिस स्टेशन चे थानेदार माननीय योगेश जी हिवसे साहेब यांची मानपूर्वक आभार.















