
चंद्रपूर : महाकाली वॉर्डातील श्री गणेश हनुमान व्यवस्थापन समिती तर्फे दिनांक २३ ऑगस्ट रोजी तान्हा पोळा उत्सवाचे आयोजन करण्यात आले. दरवर्षीप्रमाणे यावर्षीही या उत्सवात मोठ्या प्रमाणात पालक, महिला आणि लहान मुले सहभागी झाले.
या कार्यक्रमात नंदी शर्यत, वेशभूषा स्पर्धा, नंदी सजावट स्पर्धा तसेच महिलांसाठी होम मिनिस्टर खेळ घेण्यात आले. नंदी शर्यतीत सार्थक बावनकुळे यांनी प्रथम क्रमांक पटकावला. वेशभूषा स्पर्धेत आरुष जुमडे प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरला, तर नंदी सजावटीत श्लोक बुटले विजेता ठरला. महिलांच्या होम मिनिस्टर खेळात योगिता सचिन धंदाडे यांनी पहिला क्रमांक मिळवत पैठणी पारितोषिक पटकावले.

याशिवाय लकी ड्रॉमधून कृष्णा मल्लेलवार, हेमंत अंकुशे, श्रेयश रामपिल्लीवार व स्वरनिक खांडरे यांसह लहान बालकांना भेटवस्तू देण्यात आल्या. प्रत्येक सहभागी नंदीला देखील पारितोषिक देण्यात आले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अध्यक्ष – संजय बददलवार, उपाध्यक्ष डॉ. प्रा. अभय बुटले, कार्यकारी उपाध्यक्ष चंदूजी टिकले, सचिव अमोल घोडमारे यांच्यासह समितीतील सर्व सदस्य उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन डॉ. अभय बुटले यांनी केले तर आभार प्रदर्शन संजय बददलवार आणि लीना वाडियालवार यांनी केले.
समितीतील सर्व सदस्यांच्या अथक प्रयत्नामुळे महाकाली वॉर्डातील तान्हा पोळा उत्सव उत्साहपूर्ण व यशस्वीरीत्या पार पडला.















