prabodhini news logo
Home ठळक बातम्या “श्री गणेशा आरोग्याचा” अभियानाने वाशिम जिल्ह्यात आरोग्य सेवा थेट लोकांपर्यंत पोहोचवल्या

“श्री गणेशा आरोग्याचा” अभियानाने वाशिम जिल्ह्यात आरोग्य सेवा थेट लोकांपर्यंत पोहोचवल्या

0
117

शारदा भुयार जिल्हा प्रतिंनिधी, वाशिम – दि. ८ सप्टेंबर गणेशोत्सवाचा आनंद साजरा करताना वाशिम जिल्ह्यात “श्री गणेशा आरोग्याचा” हे अभियान मोठ्या उत्साहाने राबविण्यात आले. मुख्यमंत्री सहायता निधी कक्ष आणि स्थानिक गणेश मंडळांनी एकत्र येऊन २७ ऑगस्ट ते ५ सप्टेंबर २०२५ दरम्यान जिल्ह्यात ५०२ आरोग्य शिबिरे घेतली. या शिबिरांमध्ये २६,७७६ रुग्णांना वेळेवर उपचार मिळाले, तर १८२ जणांना पुढील उपचारासाठी मोठ्या वैद्यकीय केंद्रांमध्ये पाठवण्यात आले.
अभियानादरम्यान आरोग्याशी संबंधित विविध योजना, तपासण्या आणि उपचार याबाबत लोकांमध्ये जनजागृती करण्यात आली. शासकीय रुग्णालये, मुख्यमंत्री सहायता निधी नोंदणी कृत रुग्णालय, महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना नोंदणीकृत रुग्णालय आणि धर्मादाय रुग्णालयांनी या उपक्रमात उत्साहाने भाग घेतला. त्याचबरोबर स्टेमी (STEMI) आणि एच.एल.एल. (H.L.L.) यंत्रणा, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय यांचाही सहभाग या अभियानामध्ये घेण्यात आला
या अभियानांतर्गत १७ रक्तदान शिबिरेही आयोजित करण्यात आली, आणि त्यामधून ७६३ रक्तपिशव्या संकलित झाल्या. नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन या उपक्रमाला हातभार लावला.
“श्री गणेशा आरोग्याचा” या अभियानामुळे आरोग्य सेवा थेट लोकांपर्यंत पोहोचल्या आणि अनेक गरजू रुग्णांना वेळेवर उपचार मिळाले. त्याचबरोबर शासनाच्या योजना आणि सेवांबाबत लोकांमध्ये जागरूकता निर्माण झाली. गणेशोत्सवाच्या आनंदात आरोग्याची काळजी घेण्याचा हा उपक्रम लोकांसाठी खरोखरच उपयोगी ठरला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here