prabodhini news logo
Home चंद्रपूर पोलीस स्टेशन ब्रह्मपुरी आणि दिवाणी व फौजदारी न्यायालय ब्रह्मपुरी शैक्षणिक भेट

पोलीस स्टेशन ब्रह्मपुरी आणि दिवाणी व फौजदारी न्यायालय ब्रह्मपुरी शैक्षणिक भेट

0
132

रविंद्र मैंद ब्रम्हपुरी तालुका प्रतिनिधी प्रबोधिनी न्यूज

ज्ञानदीप प्रशासकीय महाविद्यालय चौगान तर्फे वरील ठिकाणी शैक्षणिक भेट दिली असता गोपनीय विभाग प्रमुख पोलीस अमलदार प्रकाश पारधी सर, आवक जावक महिला पोलीस अंमलदार शिवानी मॅडम, बीट अमलदार तेजराम जनबंधू सर, कॉन्स्टेबल अरुण पिसे सर देवेंद्र लोणबले सर सायबर पोलीस असिस्टंट यांनी देखील सायबर गुन्हे कशा पद्धतीने घडतात आणि त्यावर आपण स्वतःचा बचाव कशा पद्धतीने करू शकतो याविषयी सविस्तर माहिती दिली.
दिवाणी व फौजदारी न्यायालय ब्रह्मपुरी या ठिकाणी देखील भेट दिली त्या ठिकाणी वरिष्ठ लिपिक चट्टे सर तालुका निधी सेवा समिती ब्रह्मपुरी, न्यायाधीश गुट्टे सर व न्यायाधीश शुक्ला मॅडम यांनी न्याय निवाडा कोणत्या पद्धतीने करण्यात येते माहिती दिली.

महाविद्यालय चे प्रभारी प्राचार्य प्रधान मॅडम, कांबळी मॅडम, मेश्राम मॅडम, राधा मॅडम, प्रधान सर, दयाल सर, बुराडे बाई यांनी विशेष मेहनत घेऊन कार्यक्रम पार पाडले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here