prabodhini news logo
Home ठळक बातम्या सरकारी बसचा नंबर प्लेट तुटलेला पोलिस कारवाई फक्त नागरिकांवरच का? प्रशांत कांबळे

सरकारी बसचा नंबर प्लेट तुटलेला पोलिस कारवाई फक्त नागरिकांवरच का? प्रशांत कांबळे

0
352

प्रशांत रामटेके संपादक प्रबोधिनी न्युज – पुणे शहरात रोज दिसणारी वास्तवता म्हणजे सामान्य नागरिकांच्या वाहनावर कडक कारवाई. नंबर प्लेटवर थोडी धूळ लागली, अक्षरे पुसट झाली तरी लगेच दंड! पण, सरकारी बस क्रमांक 290, MH14 HU 6428 ही सातारा रोडवरील BRT मार्गावर डी-मार्ट समोरून जात असताना तुटलेल्या नंबर प्लेटसह धाडसीपणे फिरताना दिसली.

थेट प्रश्न नागरिकांचा उद्या या बसने अपघात घडवला तर जबाबदार कोण. नंबरच वाचत नसल्यास बसची ओळख कशी पटवणार. वाहतूक पोलिसांच्या डोळ्यासमोरून बस दिवसातून कित्येकदा जाते, तरी कारवाई का होत नाही. PMPL प्रशासन इतकं बेजबाबदार का

हेच जर एखाद्या नागरिकाच्या दुचाकी किंवा कारच्या बाबतीत घडलं असतं, तर जागेवर दंड ठोठावला गेला असता. मग शासकीय बस नियम मोडली तर गप्प का

आपलं ते मुलं आणि दुसऱ्याचं ते कार्ट अशी स्थिती आज पुण्यात निर्माण झाली आहे.

या पार्श्वभूमीवर आम आदमी पार्टी पुणे शहराध्यक्ष प्रशांत कांबळे सामाजिक न्याय विभाग यांनी संताप व्यक्त करत म्हटले की ट्रॅफिक पोलीस फक्त सामान्य नागरिकांना घेरतात. मग PMPLच्या गाड्यांवर कायदा लागू होत नाही का? पुणेकरांचा जीव धोक्यात घालणाऱ्या या बेजबाबदार व्यवस्थेवर कठोर कारवाई कधी होणार.

आम आदमी पार्टीची ठाम मागणी तातडीने संबंधित बस व ड्रायव्हरवर कारवाई करावी.

PMPL प्रशासनाने सर्व बसेसच्या नंबर प्लेटची तपासणी करून दोषींवर जबाबदारी निश्चित करावी.

ट्रॅफिक पोलिसांनी दुहेरी निकष न लावता, शासकीय वाहनांवरही समान नियम लागू करावेत.

नागरिकांच्या सुरक्षेशी खेळ करणाऱ्या या बेफिकीरपणाला आळा बसला नाही, तर आम आदमी पार्टी रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन उभारेल, असा इशारा देण्यात आला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here