prabodhini news logo
Home घुग्घुस अरे! बाप रे! रस्त्याच्या मधोमध काँग्रेस नेत्यांनी घेतला स्विमिंगचा आनंद

अरे! बाप रे! रस्त्याच्या मधोमध काँग्रेस नेत्यांनी घेतला स्विमिंगचा आनंद

0
114

प्रशांत रामटेके संपादक प्रबोधिनी न्युज – घुग्घूस : शहरातील राजीव रतन चौक याठिकाणी दुपारी 12 वाजताच्या दरम्यान शहर काँग्रेस अध्यक्ष राजुरेड्डी व कामगार नेते सैय्यद अनवर व पदाधिकाऱ्यांनी रस्त्यावरील मोठं- मोठ्या खड्ड्यात झोपून पोहणे सुरू केल्याने प्रशासनाची तारांबळ उडाली
घटनेची माहिती मिळताच तातळीने पोलीस निरीक्षक प्रकाश राऊत ताफ्या सोबत पोहचले संबंधित विभागाशी चर्चा करून तातळीने रस्त्यावरील खड्डे बुजविण्याचे कार्य सुरु करण्यात आले
पोलीस निरीक्षकांनी तातळीने प्रशासनाच्या वतीने रस्त्यावरील खड्डे बुजविण्याचे आश्वासन दिल्याने काँग्रेसने आपले अभिनव आंदोलन परत घेतले.

चंद्रपूर घुग्घूस राज्य महामार्ग MSH – 7 हा चंद्रपूर पुणे महामार्ग आहे
या महामार्गवरील घुग्घूस शहरातील राजीव रतन चौक याठिकाणी रेल्वे पुलाचा निर्माण कार्य सुरू आहे
या रस्त्यावर प्रचंड मोठ्या प्रमाणात मोठ मोठे खड्डे पडले असून यामध्ये पावसाचा पाणी साचल्याने वेकोलीच्या रामनगर, सुभाष नगर, गांधी नगर, शास्त्री नगर, इंदिरा नगर, शालिकराम नगर, आंबेडकर नगर व अन्य वसाहतीतील नागरिक तसेच यवतमाळ जिल्ह्यातील व चंद्रपूर जिल्ह्यातील प्रवास करणाऱ्या नागरिकांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतो या खड्ड्यात पडून अनेक दुचाकी धारकांचा अपघात झाला आहे.
दररोज या खड्ड्यातून उडणाऱ्या चिखलामुळे नागरिकांचे संपूर्ण कपडे व शरीर खराब होऊन जात असल्यामुळे संतप्त काँग्रेस नेत्यांनी आज अभिनव आंदोलनाच्या माध्यमातून प्रशासनाचा निषेध नोंदविला.
शहरातील रोड टॅक्स भरणाऱ्या नागरिकांना चालण्या लायक रस्ता न देऊ शकणाऱ्या सार्वजनिक बांधकाम अधिकारी, महारेलचे अधिकारी व आर. के. मदानी कंपनीच्या अधिकाऱ्यावर कारवाईची मागणी करण्यात आली.
व तातळीने रस्त्यावरील खड्डे बुजविण्यात आले तर तीव्र स्वरूपाचा आंदोलन छेळण्याचा इशारा काँग्रेसने दिला आहे.

सदर आंदोलनात ज्येष्ठ नेते शामराव बोबडे, जिल्हा महासचिव अलीम शेख, सोशल मीडिया जिल्हाध्यक्ष रोशन दंतलवार, जिल्हा सचिव अजय उपाध्ये,जिल्हा महासचिव पदमा त्रिवेणी, जिल्हा सचिव दुर्गा पाटील, शहर कार्याध्यक्ष दिप्ती सोनटक्के,संध्या मंडल, जोया शेख,रोहित डाकूर,सुनील पाटील,दिपक पेंदोर, शहशाह शेख,निखिल पुनघंटी,अरविंद चहांदे, कपील गोगला,अनवर सिद्दीकी व मोठ्या संख्येने पदाधिकारी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here