prabodhini news logo
Home ठळक बातम्या काचनगांव येथे ६९ वा धम्मचक्र प्रवर्तन दिन मोठ्या उत्साहात साजरा

काचनगांव येथे ६९ वा धम्मचक्र प्रवर्तन दिन मोठ्या उत्साहात साजरा

0
113

हिंगणघाट प्रतिनिधी प्रबोधिनी न्युज नेटवर्क – हिंगणघाट तालुक्यातील काचनगांव या गावात ६९ वा धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त धम्म रॅलीचे आयोजन करण्यात आले.सकाळी ८ वाजता पंचशील झेंड्याचे ध्वजारोहण करण्यात आले,त्यानंतर सामुहिक बुध्द वंदना व बाबासाहेबांनी धम्मदिक्षेच्या वेळी दिलेल्या २२ प्रतिज्ञाचे पठण करण्यात आले.त्यानंतर सामुहिक धम्म रॅली गावामधून काढण्यात आली. रॅलीमध्ये शेकडो भीमसैनिक सहभागी झाले होते. डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो व महाकारूनिक गौतम बुद्धांची करुणा असो, अश्या जयघोषाने सारा गांव दुमदुमला. शेवटी मान्यवरांचे मार्गदर्शन झाले,सूत्र संचालन मा.अमोल बुराबुरे यांनी केले तर प्रास्ताविक मा .प्रदीप भोंगाडे तर मार्गदर्शन मां.विवेक नाखले, व सूरज ताकसांडे यांनी केले,तर प्रमुख पाहुणे म्हणून मा.सोनुभाऊ कांबळे होते.आभार प्रदर्शन मा. विलास नगराळे यांनी केले. सदर कार्यक्रमात मा.संतोष नगराळे यांनी भीम बुध्द गीते सादर केली. सदर धम्मचक्र प्रवर्तन दिनाचा संपूर्ण कार्यक्रम नागार्जुन बुद्ध विहार काचनगाव समितीच्या वतीने आयोजित करण्यात आला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here