prabodhini news logo
Home ठळक बातम्या सुरक्षा संशोधीत सोयाबीन पीक पहाणी

सुरक्षा संशोधीत सोयाबीन पीक पहाणी

0
96

वर्धा प्रतिनिधी प्रबोधिनी न्युज – सुवेद सीड्स प्रा. ली. या कंपनीचे संशोधीत सोयाबीन वाण सुरक्षा या पीकाची पीक पाहणी कार्यक्रम रामदास माणकर राहणार वायगाव यांच्या शेतात दि. ७ ऑक्टोबरला पाचशे शेतक-यांच्या उपस्थितीत संपन्न झाला.
या सुरक्षा सोयाबीन वाणाची प्रत्यक्ष माहिती केंद्रीय कापुस अनुसंधान नागपुरचे माजी वैज्ञानीक डॉ. राजु व डॉ. राजकुमार रामटेके यांनी दिली. त्यांनी बुरशी, येलो मोझॅक आणि कोणते वाण रोग प्रतिकारक क्षमतेचे आहे, त्याबद्धल माहिती दिली. सुरक्षा सोयाबीन वाणाचा शेंगावर लव व झाडाला ८० ते १०० शेंगा पाहून शेतकरी या वाणाची तारीफ करू लागले.

या वाणाच्या पिकावर जास्त पावसाचा सुद्धा फरक पडलेला नाही. सुरक्षा हे वाण बुरेल असल्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती त्यांच्यामध्ये खूप जास्त आहे. शेंगाचा दाणा मोठा असल्यामुळे एकरी उत्पादनात वाढ होते. या कार्यक्रमाला कंपनीचे संचालक गजेन्द्र लढी, कृष्णकुमार पडवंशी, व अधिकृत विक्रेता मुन्ना मिराणी, गजानन महाजन, सचिन कुरडकर, प्रमोद डहाके, मंगल बैद तसेच दिलीप नाखले, नामदेव तडवेकर, तुळशीराम हेलोडे, समीर इंगोले, पुरुषोतम कलोडे, यशवंत दरणे, महेन्द्र पुडके, मारोतराव फडताळे उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here