prabodhini news logo
Home चंद्रपूर निर्मला माता शुद्धतेचे, मातृत्वाचे आणि करुणेचे प्रतीक – आ. किशोर जोरगेवार

निर्मला माता शुद्धतेचे, मातृत्वाचे आणि करुणेचे प्रतीक – आ. किशोर जोरगेवार

0
123

निर्मला माता मंदिर येथे दीपोत्सवाचे आयोजन

निर्मला माता शुद्धतेचे, मातृत्वाचे आणि करुणेचे प्रतीक आहे. या देवीच्या उपासनेतून आपल्याला जीवनातील चांगुलपणा आणि सहअस्तित्वाची प्रेरणा मिळते. आपण सर्वजण जेव्हा श्रद्धेने, प्रेमाने आणि एकमेकांच्या सहकार्याने सण साजरे करतो, तेव्हा समाजात ऐक्य आणि सौहार्द निर्माण होतो, असे प्रतिपादन आमदार किशोर जोरगेवार यांनी केले.
प्रकाश, श्रद्धा आणि भक्तीचा संगम असलेला दीपोत्सव उत्सव मोरवा येथील निर्मला माता मंदिरात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. मंदिर परिसर हजारो दिव्यांच्या प्रकाशाने उजळून निघाला होता. या सोहळ्याला भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून निर्मल मातेच्या च्या दर्शनाचा लाभ घेतला. या कार्यक्रमात आमदार किशोर जोरगेवार बोलत होते. यावेळी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष रविंद्र शिंदे, भारतीय जनता पक्षाचे महानगर अध्यक्ष सुभाष कासनगोट्टूवार, राजेश वांढरे, प्रदीप लोखंडे, संतोष आक्कुलवार, विलास शेरकुरे, रमेश खुरगे आदींची उपस्थिती होती.
यावेळी पुढे बोलताना आ. जोरगेवार म्हणाले की,
आज या पवित्र निर्मला माता मंदिराच्या प्रांगणात उभा राहून मला अत्यंत आनंद आणि समाधान वाटत आहे. मंदिर परिसर दिव्यांच्या प्रकाशाने उजळलेला, भक्तिभावाने भारलेला आहे. आपण प्रत्येकाने आपल्या जीवनात ज्ञानाचा, संस्कारांचा आणि प्रेमाचा दीप प्रज्वलित करावा. आपल्या मोरवा परिसरातील नागरिकांनी अत्यंत सुंदर आयोजन केले आहे. या परिसरातील विकासकामांसाठी आपण कटिबद्ध आहे. मंदिर परिसर अधिक सुशोभित आणि सोयीसुविधायुक्त करण्यासाठी आवश्यक ते प्रयत्न करण्यात येतील, असे यावेळी आमदार किशोर जोरगेवार म्हणाले.
मंदिर परिसर दिव्यांच्या रांगोळ्यांनी, फुलांनी आणि सजावटीच्या दिव्यांनी नटलेला होता. भक्तांनी आरत्या, भजन, कीर्तन आणि माता निर्मलेच्या जयघोषांनी संपूर्ण परिसर भक्तिमय केला होता. यावेळी स्थानिक नागरिक आणि भक्तांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here