
प्रशांत रामटेके संपादक प्रबोधिनी न्युज – चंद्रपूर: सुशीलाबाई रामचंद्रराव मामिडवार समाजकार्य महाविद्यालय पडोली चंद्रपूर, येथील विद्यार्थिनी जानिया जयेंद्र सवाईमुल हे समाजकार्याच्या प्रथम वर्षाला शिक्षण घेत आहे. आज तिची निवड राज्यस्तरीय सांस्कृतिक महोत्सव हे, कवियत्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ या ठिकाणी दिनांक 3 ते 9 नोव्हेंबर 2025 ला करण्यात आले आणि निवड झाल्यामुळे महाविद्यालयात आनंदाचे वातावरण तयार झाले आहे. आणि सर्वांनी अभिनंदन व कौतुक केले. प्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. ममता ठाकूरवार आणि कार्यक्रम अधिकारी डॉ. जयश्री कापसे व डॉ. कल्पना कवाडे आणि सर्व प्राध्यापक आणि विद्यार्थी यांनी जानिया चे अभिनंदन केले. परिवारासाठी आणि महाविद्यासाठी ही एक अभिमानास्पद बाब आहे. कार्यक्रमप्रसंगी जानिया ला सन्मानित करण्यात आले. तिच्या समोरील प्रवासकरिता खूप खूप शुभेच्छा..















