prabodhini news logo
Home ठळक बातम्या काकड आरती, भजनांनी पहाटेचा प्रहर होतो प्रसन्न

काकड आरती, भजनांनी पहाटेचा प्रहर होतो प्रसन्न

0
114

कार्तिक मास : वृद्धांसह युवावर्ग व मुलांचीही उपस्थिती

जयेंद्र चव्हाण
विशेष जिल्हा प्रतिनिधी भंडारा
मो.9665175674

(भंडारा) – ‘उठा जागे व्हा रे आता, स्मरण करा पंढरीनाथा।’ अशा भक्तिमय भजनांनी पहाटेची सुरुवात होते. भल्या पहाटेस मंदिरातून येणारे काकड आरतीचे सूर कानी पडताच प्रसन्नता अनुभवास येते. अभंगांमधून उपदेशपर वचने कानी पडतात. कोजागिरी अश्विन शुद्ध पौर्णिमेच्या दुसऱ्या दिवसापासून काकड आरतीला सुरुवात होते. हिंदू धर्मात आरतीला काकड अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले आहे. याच महिन्यात दिवाळी हा धार्मिक सण येतो. या महिन्याचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे, गावागावांत महिनाभर पहाटे काकड आरतीचा गजर होतो.

भंडारा तालुक्यातील टाकळी (पूनर्वसन) येथे सार्वजनिक हनुमान मंदिरात सुकदेव देशकर, राजू बोरकर, शंकर पवनकर, प्रविण शहारे, वासुदेव देशकर, लक्ष्मण बोरकर, राधेश्याम देशकर, ज्ञानेश्वर भेदे, बिसन भेदे, गंगाबाई देशकर, पारबता पवकर, नर्मदा भेदे, राधा पवनकर, भास्कर देशकर, बिसन भेदे, बबलू देशकर, विनोद भेदे, शिवपाल नेरकर, गौरी देशकर, सतिश बोरकर, नामदेव देशकर, सुनिल भोपे, ललित हिवराज देशकर, मंथन पवनकर, गुलशन नेरकर, सिमरण भेदे, भेदे, पियुष देशकर इत्यादी मंडळी हे भजन, आरती व हरिनामाचा गजर करीत गावकरी भजनस्वरात दंग होतानाचे चित्र दिसत आहे.
यासह भजनी मंडळी, वारकरी काकड आरतीची पिढ्यान् पिढ्यांची परंपरा आजही तेवढ्याच उत्साहात जोपासत आहेत. काकड आरतीसाठी भाविकांची गर्दी होत असते. पहाटेस उठून स्नान करून शुचिर्भूत होऊन भाविक स्त्री व पुरुष आणि मुलेही मंदिरात एकत्र जमा होऊन भजन, आरती व हरिनामाचा भारदार आवाजात गजर करीत भजनस्वरात दंग होताना दिसत आहेत.

काकड आरतीच्या सुमधुर स्वरांनी जाग येत असून सुरू असलेल्या कार्तिक मासात भक्तीचा सुगंध दरवळत आहे. रामप्रहरी काकड आरती, अभंग, पांगुळ, वासुदेव, गवळण, भूपाळीचे सूर आणि टाळ-मृदंगांचा गजर सुरू होऊन दिवस उजाडेपर्यंत ऐकायला मिळतात. ‘उठा उठा साधुसंत, साधा आपुलाले हित, गेला हा नरदेह, मग कैसा भगवंत!’ अशा प्रकारचे विविध अभंग भजन मंडळी एक ते दीड तास भक्तिरसात तल्लीन होऊन गातात. गोड प्रसाद वितरणाने त्या दिवशीच्या काकड आरतीची सांगता होते. याप्रमाणे हा काकड आरतीचा कार्यक्रम कार्तिक (त्रिपुरा) पौर्णिमेपर्यंत नित्यनेमाने सुरू असतो. त्यानंतर भजन, कीर्तन दहीकाला व महाप्रसादाने काकड आरती या समारोप केला जातो.

आरोग्यासाठी उत्तम काळ

हिवाळ्यात आल्हाददायी वातावरण असते. पहाटेच्या वातावरणात ऑक्सिजनचे प्रमाण अधिक असते. अशा वातावरणामुळे मानवी आरोग्य सुदृढ राहण्यास मोठी मदत होते. हरिनामाचा गजर केल्याने मनाला आंतरिक शांती लाभते. आजच्या धकाधकीच्या जीवनात शांतप्रिय जीवनाची गुरुकिल्ली हरिनामाच्या गजराने प्राप्त होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here