
पंचनामे करून नुकसानभरपाई देण्याची सरपंच संघटनेचे अध्यक्ष सोनू नाकतोडे यांची मागणी
रविंद्र मैंद ब्रम्हपुरी तालुका प्रतिनिधी प्रबोधिनी न्यूज
ब्रम्हपूरी – या वर्षीच्या खरीप हंगामात निसर्गाने सुरवातीपासूनच शेतकऱ्यांवर अवकृपा दाखवली आहे. मागील आठवड्यात झालेल्या सततच्या पावसामुळे कापणीला आलेले व कापुन शेतात असलेले धानपिक खराब झाले असुन शेतकऱ्यांच्या तोंडाशी आलेला घास हिरावल्या गेला आहे. त्यामुळे ब्रम्हपूरी तालुक्यातील नुकसानग्रस्त धान पिकांचे पंचनामे करून नुकसानभरपाई द्यावी अशी मागणी ब्रम्हपूरी तालुका सरपंच संघटनेचे अध्यक्ष, तथा युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष सोनू नाकतोडे यांनी शासनदरबारी केली आहे.
ब्रम्हपूरी तालुका हा धान उत्पादक शेतकऱ्यांचा तालुका आहे. येथील शेतकरी हा आपल्या शेतातील पिकाच्या भरवशावर आपला उदरनिर्वाह करीत असतो. मात्र यावेळी निसर्गाच्या चक्रात येथील शेतकरी भरडल्या गेला आहे. सध्यस्थितीत हलक्या प्रतीच्या धानाची कापणी झाली आहे. व शेतकऱ्यांनी शेतात धानाच्या कडपा ठेवल्या आहेत. तर जड प्रतिचा धान परिपक्व होऊन कापणीला आलेला आहे. मात्र मागील आठवड्यात आलेल्या सततच्या पावसामुळे धान पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांवर मोठे संकट ओढावले असुन नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे करून नुकसानभरपाई द्यावी अशी मागणी ब्रम्हपूरी तालुका सरपंच संघटनेचे अध्यक्ष, तथा युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष सोनू नाकतोडे यांनी केली आहे.















