
आगामी निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद वाढणार
सिरोंचा प्रतिनिधी प्रबोधिनी न्युज – गडचिरोली जिल्ह्यातील सिरोंचा तालुक्यातील रामांजपूर येथील राजराजेश्वरी फंक्शन हॉल मध्ये अहेरी विधानसभा क्षेत्राचे लोकप्रिय आमदार तथा माजी कॅबिनेट मंत्री मा. डॉ. धर्मराव बाबा आत्राम यांच्या प्रमुख उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विचारधारा व सर्वसमावेशक भूमिकेवर विश्वास ठेवून सिरोंचा तालुक्यातील झिंगानूर,असरअल्ली,रेगुंठा, अमरावती तसेच अहेरी तालुक्यातील मरपली परिसरातील विविध पक्षातील मान्यवरांचा जाहीर पक्षप्रवेश पार पडला. यावेळी सिरोंचा तालुक्यातील जयसुधा बानय्या जनगाम,माजी सभापती जि.प.गडचिरोली व अहेरी तालुक्यातील मरपली येथील शंकर कोंडागोर्ला यांच्यासह विविध पक्षातील प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.
आमदार या नात्याने मा.डॉ. धर्मरावबाबा आत्राम, युवनेता हर्षवर्धन बाबा आत्राम, सिनेट सदस्य तनुश्री आत्राम यांनी नव्याने पक्षात सामील झालेल्या सर्व मान्यवरांचे राष्ट्रवादी परिवारात मनःपूर्वक स्वागत केले. या नवप्रवेशामुळे पक्षाची संघटनात्मक ताकद अधिक बळकट होईल, असा विश्वास व्यक्त केला. तसेच पक्षाची ध्येयधोरणे आणि विचारधारा याबद्दल सर्वांना मार्गदर्शन केले.
तसेच आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पक्षविस्ताराच्या कार्यात सक्रिय सहभाग नोंदविण्याचे सर्वांना आवाहन केले.
या कार्यक्रमाला राष्ट्रवादी युवा नेता हर्षवर्धन बाबा आत्राम, सिनेट सदस्य तनुश्री आत्राम, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे तालुका अध्यक्ष मधुकर कोल्लूरी, नगरसेवक सतीश भोगे, राष्ट्रवादीचे बानय्या जनगाम, नगरसेवक जगदीश रालाबंडीवार, नगरसेवक सतीश राचारलावार, सिरोंचा शहर अध्यक्ष रवी सुलतान,राष्ट्रवादी महिला अध्यक्ष वेंकटलक्ष्मी अरवेल्ली,नपं सिरोंचाचे नगरसेविका सपना तोकाला, विधानसभा अध्यक्ष लक्ष्मण येर्रावार,कार्यकारी अध्यक्ष मदनय्या मादेशी, तालुका उपाध्यक्ष कोंडाय्या कटकू, सेवादल अध्यक्ष ओमप्रकाश ताटीकोंडावार, रामन्ना कडार्ला, बापू रंगूवार,लोकमत पत्रकर नागभूषणम चकिनारपुवार, सरपंच अजय आत्राम, सूरज गावडे, लक्ष्मण गावडेसह सिरोंचा तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार )गटाचे माजी जिप व पंचायत समिती सदस्य, सरपंच, उपसरपंच आणि पदाधिकारी, स्थानिक नेते, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.















