
निवडणूक अध्यक्षपदासाठी एकुण ८३ तर सदस्यपदासाठी १ हजार ६३ नामनिर्देशनपत्र दाखल
नामनिर्देशनपत्राची १८ नोव्हेंबर रोजी होणार छाननी
वाशिम , दि. १७ नोव्हेंबर (जिमाका) वाशिम जिल्ह्यातील ४ नगरपरिषदा व एका नगरपंचायतींच्या सन २०२५ मधील सार्वत्रिक निवडणुकीसाठी नामनिर्देशनपत्र सादर करण्यासाठी १० नोव्हेंबर २०२५ पासून सुरुवात करण्यात आली होती.
नामनिर्देशनपत्र दाखल करण्याचा अंतिम दि. १७ नोव्हेंबर २०२५ पर्यंत (सार्वजनिक सुटीसह) जिल्ह्यात अध्यक्ष पदासाठी एकुण ८३ तर सदस्य पदासाठी १ हजार ६३ नामनिर्देशनपत्र स्विकारण्यात आली आहेत.
नामनिर्देशनपत्रांची छाननी व वैधरित्या नामनिर्देशित झालेल्या उमेदवारांची यादी १८ नोव्हेंबर २०२५ रोजी प्रसिद्ध होणार आहे.
निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या निर्णयाविरुद्ध अपील नसलेल्या ठिकाणी २१ नोव्हेंबर २०२५ पर्यंत तर अपील असलेल्या ठिकाणी २५ नोव्हेंबर २०२५ पर्यंत नामनिर्देशनपत्रे मागे घेता येणार आहेत.
अंतिमरित्या निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांची यादी २६ नोव्हेंबर २०२५ रोजी प्रसिध्द होईल, अशी माहिती नगरपालिका प्रशासन जिल्हा सहआयुक्त बाबुराव बिक्कड यांनी दिली आहे.
वाशिम जिल्ह्यात नगरपरिषद व नगरपंचायत निहाय १० ते १७ नोव्हेंबर २०२५ रोजी शेवटच्या दिनांकापर्यंत एकुण नामनिर्देशनपत्राची संख्या पुढीलप्रमाणे आहे.
वाशिम नगरपरिषद
अध्यक्षपदासाठी एकुण ३२ तर सदस्यपदासाठी एकुण ३८५ नामनिर्देशनपत्र प्राप्त झाली आहेत.
तर १७ नोव्हेंबर रोजी अध्यक्ष पदासाठी २१, सदस्य पदासाठी ९० असे एकूण २११ नामनिर्देशन अर्ज प्राप्त झाले.
कारंजा नगरपरिषद
अध्यक्षपदासाठी एकुण १५ तर सदस्यपदासाठी एकुण २४६ नामनिर्देशनपत्र प्राप्त झाली आहेत.
तर १७ नोव्हेंबर रोजी अध्यक्ष पदासाठी १२, सदस्य पदासाठी १०३ असे एकूण ११५ नामनिर्देशन अर्ज प्राप्त झाले.
रिसोड नगरपरिषद
अध्यक्षपदासाठी एकुण १३ तर सदस्यपदासाठी एकुण १८७ नामनिर्देशनपत्र प्राप्त झाली आहेत.
तर १७ नोव्हेंबर रोजी अध्यक्ष पदासाठी ०३ ,सदस्य पदासाठी ५३ असे एकूण ५६ नामनिर्देशन अर्ज प्राप्त झाले.
मंगरूळपीर नगरपरिषद
अध्यक्षपदासाठी एकुण १४ तर सदस्यपदासाठी एकुण १६२ नामनिर्देशनपत्र प्राप्त झाली आहेत.
तर १७ नोव्हेंबर रोजी अध्यक्ष पदासाठी ०४ ,सदस्य पदासाठी ४८ असे एकूण ५२ नामनिर्देशन अर्ज प्राप्त झाले.
मालेगाव नगरपंचायत
अध्यक्षपदासाठी एकुण ९ तर सदस्यपदासाठी एकुण ८३ नामनिर्देशनपत्र प्राप्त झाली आहेत.
तर १७ नोव्हेंबर रोजी अध्यक्ष पदासाठी ०३ ,सदस्य पदासाठी २५ असे एकूण २८ नामनिर्देशन अर्ज प्राप्त झाले.
नागरिकांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे आणि सर्व संबंधित विभागांच्या समन्वयातून नामनिर्देशनाची संपूर्ण प्रक्रिया अत्यंत पारदर्शक, सुरळीत आणि निर्विघ्न पार पडली. लोकशाही बळकट करण्यासाठी ही सकारात्मक दिशा आहे.
_योगेश कुंभेजकर जिल्हाधिकारी वाशिम.















