
एका जागेवर माळी समाजाला प्रतिनिधित्व!
वाशिम : वंचित बहुजन आघाडीने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी सामाजिक प्रतिनिधित्वला प्राधान्य देत वाशिम जिल्ह्यात महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. जिल्ह्यातील नगराध्यक्षपदासाठी एकूण पाच ठिकाणी उमेदवार जाहीर करण्यात आले असून, त्यापैकी चार जागांवर मुस्लिम समाजातील उमेदवारांना तर एका जागेवर माळी समाजातील उमेदवाराला प्रतिनिधित्व देण्यात आले आहे.
माळी समाजाचे वैभव नितीन उलेमले यांना वाशिम नगर परिषदेत नगराध्यक्ष पदासाठी संधी देण्यात आली असून, ४ ठिकाणी मुस्लिम समाजातील उमेदवारांना संधी दिली आहे.
वाशिम जिल्ह्यातील नगराध्यक्ष पदासाठी उमेदवार :
मालेगाव नगरपंचायत ― रेहमान अहमद शाह, रिसोड नगरपरिषद – शेख सलीम शेख फरीद, कारंजा नगरपरिषद – फिरदोस अन्वर सय्यद नसिरोद्दिन,
मंगरूळपीर नगरपरिषद – शादाब अहमद रियाज अहमद कुरेशी,
वाशिम नगर परिषद ― वैभव नितीन उलेमले, (माळी समाज)
या उमेदवारांमुळे जिल्ह्यातील निवडणूक रंगात आली असून, वंचित बहुजन आघाडीने निवडणुक प्रचारात आघाडी घेतली आहे.















