prabodhini news logo
Home ठळक बातम्या पिंपरी-चिंचवडमध्ये ‘संविधान सन्मान महासभे’चा प्रचार!

पिंपरी-चिंचवडमध्ये ‘संविधान सन्मान महासभे’चा प्रचार!

0
131

पिंपरी-चिंचवड : वंचित बहुजन युवक आघाडीचे पिंपरी-चिंचवड शहर अध्यक्ष विनोद गायकवाड यांनी ‘संविधान सन्मान महासभे’चे वेगवेगळ्या मान्यवरांना निमंत्रण दिले. या सभेला जास्तीत जास्त नागरिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहनही त्यांनी केले आहे.
संविधानाचा आदर आणि सन्मान जपण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या या महासभेसाठी विविध सामाजिक आणि धार्मिक संघटनांना निमंत्रण देण्यात आले आहे.
यामध्ये प्रामुख्याने धम्मचक्र बुद्ध विहार, भटक्या विमुक्त संघटना आणि बौद्ध समाज विकास महासंघ या संघटनांच्या पदाधिकाऱ्यांना आणि सदस्यांना महासभेत सहभागी होण्यासाठी विशेष निमंत्रण देण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here