prabodhini news logo
Home ठळक बातम्या दुगड शाळा परिसरात मध्यरात्री टोळीने केली तोडफोड; नागरिक दहशतीत

दुगड शाळा परिसरात मध्यरात्री टोळीने केली तोडफोड; नागरिक दहशतीत

0
100

पुणे प्रतिनिधी प्रबोधिनी न्युज नेटवर्क – अंबेगाव खुर्दमधील दुगड शाळा परिसरात काल मध्यरात्री भीषण घटना घडली. रात्री साधारण १२.३० वाजण्याच्या सुमारास कोयता घेऊन आलेल्या एका गटाने परिसरात अचानक दहशत निर्माण केली. दुगड शाळा मागील अटल १२ भागात या टोळीने रस्त्यावर उभ्या असलेल्या वाहनांची बेछूट तोडफोड केली.

मध्यरात्रीच्या शांततेत घडलेल्या या प्रकारामुळे संपूर्ण परिसर हादरला. अचानक आलेल्या या टोळीमुळे नागरिक भीतीने घराबाहेर पाहायलाही तयार नव्हते. मुलं, महिला आणि वृद्ध नागरिकांमध्ये प्रचंड असुरक्षिततेचे वातावरण निर्माण झाले आहे.

या तोडफोडीत अनेक वाहनांचे नुकसान झाले असून स्थानिक रिक्षाचालकाच्या रिक्षेलाही गंभीर हानी झाली आहे. उपलब्ध छायाचित्रांतून तोडफोडीची भीषणता समोर येते.

स्थानिक रहिवाशांचे म्हणणे आहे की, दुगड शाळा परिसरात यापूर्वीही काही संशयास्पद हालचाली आणि घटना घडल्या आहेत, परंतु मध्यरात्री कोयत्यासह टोळी फिरत असल्याची ही पहिलीच मोठी घटना आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये संताप आणि भीती दोन्ही वाढल्या आहेत.

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तपास सुरू केला असून कोणत्या गटाचा सहभाग आहे याचा शोध घेतला जात आहे. नागरिकांनी दुगड शाळा परिसरात वाढीव पोलिस गस्त, सीसीटीव्ही तपासणी आणि आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

सध्या वातावरण तणावपूर्ण असून आम आदमी पार्टी शहराध्यक्ष प्रशांत कांबळे सामाजिक न्याय विभाग यांनी प्रशासनाने तातडीने लक्ष घालण्याची गरज पुणे शहरांमध्ये वारंवार टोळी युद्ध कोयता घ्या ही वाढ चालली असून पोलीस प्रशासनाने हे सर्व मोडीत काढलं पाहिजे असे वक्तव्य केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here