prabodhini news logo
Home ठळक बातम्या ऑल इंडिया समता सैनिक दलाच्या वतीने महापरिनिर्वाण दिन साजरा

ऑल इंडिया समता सैनिक दलाच्या वतीने महापरिनिर्वाण दिन साजरा

0
159

रक्तदान शिबिर, डोनेट एक वही, एक पेन, मानवंदना व अभिवादन सभा दलाचा कार्यक्रम संपन्न

पद्माकर कांबळे जिल्हा प्रतिनिधी वर्धा – वर्धा:ऑल इंडिया समता सैनिक दल वर्धा च्या वतीने सिव्हिल लाईन डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ रक्तदान शिबिर व डोनेट एक पेन एक वही उपक्रम या कार्यक्रमाचे उद्घाटन सामाजिक कार्यकर्त्या संध्या साठे यांच्या हस्ते पार पडले. यावेळी संदीप थुल, चरण गायकवाड, दिलीप वैद्य, धर्मपाल गोटे, प्रमोद घरडे ,सुनील शेंडे, सुधीर मुरार, यांनी विचार व्यक्त केले. यानंतर मानवंदना सामाजिक कार्यकर्त्या संध्या साठे, विदर्भ सचिव रमेश निमसडकर व कॅप्टन सुनील बाभळे यांच्या उपस्थितीत देण्यात आली. यानंतर अभिवादन सभेला सामाजिक कार्यकर्त्या द्रोपदाबाई साठे यांनी अध्यक्षीय विचार व्यक्त केले.

या अभिवादन सभेला जिल्हा उपाध्यक्ष आशिष रत्नमाला नरेश लोखंडे , महाराष्ट्र प्रदेश कार्यकारी सदस्य अनिल खडतकर,जिल्हा सचिव आम्रपाल कांबळे, महाराष्ट्र प्रदेश कार्यकारी सदस्य आरती निमसडकर, जिल्हा बौद्धिक प्रमुख डॉ. माधवी पाटील, तालुका बौद्धिक प्रमुख रचना नगराळे, जिल्हा उपाध्यक्ष सरिता प्रशांत कुसळे यांनी विचार व्यक्त केले. अभिवादन गीत शाखा अध्यक्ष पद्माकर कांबळे यांनी सादर केले. यावेळी होतकरू उन्नती मांढरे, निकिता लोखंडे, मोनिका चव्हाण या तीन विद्यार्थिनींना स्पर्धा परीक्षेचा संच या दिनाचे औचित्य साधून दान करण्यात आला. मार्च पास चे नेतृत्व जीवनप्रकाश निमसडकर, राजू शेंडे, राजकुमार बाराहाते, दिलीप नारायणे, अविनाश तामगाडगे, लीना पाटील, प्रतिभा कांबळे यांनी केले. कार्यक्रमाचे संचालन महेंद्र रत्नबोधी व आभार तालुकाध्यक्ष संदीप थुल यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here