
आरमोरी प्रतिनिधी प्रबोधिनी न्युज नेटवर्क – आरमोरी येथील हितकारणी उच्च माध्यमिक विद्यालय येथे आज जगतगुरु नरेंद्राचार्य महाराज संस्थान दक्षिण पिठ नाणीजधाम यांच्या वतीने रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी याच्या सामाजिक उपक्रमास आमदार रामदास मसराम यांनी भेट देऊन माऊलीच्या पादुकेचे दर्शन घेतले त्यात जगतगुरु नरेंद्राचार्य संस्थानच्या सामाजिक उपक्रमा अंतर्गत गरजुना आरमोरी विधानसभेचे आमदार रामदास मसराम यांच्या हस्ते पिट दळी मशिन चे वितरण करण्यात आले याप्रसंगी संस्थानच्या वतीने आमदार मसराम यांचा सत्कार करण्यात आले.
यावेळी आरमोरी तालुका काँग्रेस चे अध्यक्ष मिलिंद खोब्रागडे माजी पंचायत समिती सदस्य परसराम टिकले सामाजिक कार्यकर्ते दिलीप घोडाम नितीन राऊत धनपाल मिसार सर प्राचार्य श्रिकृष्ण खरकाटे गटपायले यांच्या सह अन्य मान्यवर उपस्थित होते.















