
घुग्घुस प्रतिनिधी प्रबोधिनी न्युज नेटवर्क – विकासाची ध्येयधुनी आणि जनसेवेचा वसा घेऊन आज घुग्गुस नगरपरिषद मधील प्रभाग क्रमांक ३, ४ आणि ५ मध्ये परिवर्तनाचे रणशिंग फुंकले गेले आहे! आमदार मा. विजय वडेट्टीवार यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या भव्य कॉर्नर सभेने हे सिद्ध केले आहे की, आता बदल निश्चित आहे.
प्रभाग क्र .३ मध्ये नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार दीप्ती सोनटक्के व नगरसेवक पदाचे उमेदवार राजू रेड्डी व आशा पानघाटे तसेच प्रभाग क्र. ४ मधून नगरसेवक पदाचे उमेदवार गजानन माशीरकर व केतकी चेतन घोरपडे, आणि प्रभाग क्र. ५ मधून नगरसेवक पदाचे उमेदवार रोशन पचारे व सौ. अर्चना प्रशांत सारोकर या सर्व उमेदवारांच्या विजयासाठी जनसागर उसळला होता.

याप्रसंगी, प्रामुख्याने सर्व उमेदवारांना पाठिंबा देण्यासाठी महिला जिल्हाध्यक्ष चंद्रपूर कुंदा जेणेकर, ग्रामीण तालुका अध्यक्ष चंद्रपूर अनिल नरुले, चंद्रपूर शहराध्यक्षा चंदाताई वैरागडे यांसह प्रवीण पडवेकर, नंदू नागरकर, प्रमोद बोरीकर व सर्व काँग्रेस पदाधिकारी ,कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत ही सभा ऐतिहासिक ठरली.
ही केवळ गर्दी नव्हती, तर आपल्या शहराच्या उज्ज्वल भविष्यासाठी नागरिकांनी दिलेली ग्वाही होती. आता प्रगतीच्या या प्रवासात आपण सर्वांनी एकजुटीने सहभागी होऊन आपल्या उमेदवारांना भरघोस मतांनी विजयी करूया!















