
रामगोपाल अट्टेला
विशेष तालुका प्रतिनिधी, सिरोंचा
सिरोंचा – अहेरी विधानसभा क्षेत्राचे आमदार डॉ. धर्मराव बाबा आत्राम यांच्या कट्टर कार्यकर्ता तथा ग्रामपंचायत सोमनपल्लीचे सरपंच पुष्पालता आसम यांच्या अल्पशा आजाराने दुःखद निधन झाली. या दुःखद घटनेमुळे आसम कुटुंबावर शोकाकळा पसरली.
सोमनपल्लीचे सरपंच स्व. पुष्पालता आसम यांच्या निधन झाल्याची माहिती मिळतच आमदार डॉ. धर्मराव बाबा आत्राम यांनी लगेच सिरोंचा तालुका अध्यक्ष मधुकर कोल्लूरी यांना तात्काळ सोमनपल्लीला पाठवून स्व. पुष्पालता आसम यांच्या कुटुंबाची सांत्वन करून आमदार धर्मराव बाबा आत्राम यांच्या नेतृत्वाखाली आसम कुटुंबाला आर्थिक मदत देण्यात आली.
यावेळी सिरोंचा तालुका राका अध्यक्ष मधुकर कोल्लूरी, त्यांच्यासोबत व्यंकटेश्वर भंडारी , देवाजी आसम, लक्ष्मण पिर्ला,मोहन जाडी,राष्ट्रवादी सोशल मीडिया प्रतिनिधी तिरुपती चिट्याला,शंकर कापूला आदी उपस्थित होते.















