
प्रशांत रामटेके संपादक प्रबोधिनी न्युज नेटवर्क – दर वर्षी मातृभाषा अध्यापक संस्था, पुणे.यांच्या वतीने मराठी भाषा प्रचार, प्रसार व संवर्धन यासाठी विविध स्पर्धा घेण्यात येतात.नुकत्याच या उपक्रमाअंतर्गत श्री ना दा ठाकरसी कन्या शाळा नारायणपेठ पुणे येथे नाट्यवाचन स्पर्धा घेण्यात आल्या. १६ व १७ डिसेंबर अशा दोन दिवस इयत्ता पाचवी ते सातवी लहान गट . इयत्ता आठवी ते दहावी मोठा गट.अशा दोन गटात स्पर्धा घेण्यात आल्या .स्पर्धेत विद्यार्थ्यांनी उत्तम सराव करून सहभाग घेतला हे सादरीकरण करताना जाणवत होते.शिक्षकांसाठी संहिता लेखन स्पर्धा घेण्यात आली.उत्साहपूर्ण वातावरणात स्पर्धेचा उद्घाटन समारंभ पार पडला.कन्याशाळेच्या मुख्याध्यापिका मा.माया कोथाळीकर यांच्या हस्ते सरस्वती पूजन करण्यात आले.सदर कार्यक्रमासाठी प्रशालेच्या मुख्याध्यापिका मा.माया कोथाळीकर यांचे खूप सहकार्य लाभले.वर्गखोल्या उपलब्ध करून दिल्या.महाडिक मॅडम यांनी फलक लेखनासह सर्व पूर्वतयारी केली.अनिता खैरे यांनी नाट्य वाचन,वाचिक अभिनय, आवाजातील चढउतार यांविषयी विद्यार्थी व शिक्षकांना मार्गदर्शन केले.सुरेखा लेंभे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.अभिनव विद्यालयाच्या मुख्याध्यापिका मा.वंदना आणेकर यांनी संस्थेच्या कार्याची ओळख करून दिली.मा.गीता निमल यांनी परीक्षकाचा परिचय करून दिला.संस्थेच्या अध्यक्षा मा.स्मिता ओव्हाळ यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. इ . ५ वी ते इ . ७ वी, इ. ८ वी ते इ. १० वी दोन गट. असे दोन गटांची स्पर्धा होती.

मा .अनिता खैरे आंतरशालेय नाट्य स्पर्धेसाठी मार्गदर्शक म्हणून कार्य केले आहे.
मा.शोभा वाडेकर-आंतरशालेय स्पर्धा,सूत्रसंचालक, लेखन, इ.क्षेत्रात कार्यरत. मा. शैलजा दिवटे -आंतरशालेय नाट्य स्पर्धेसाठी अनेक वर्ष कार्यरत. मा.शामला पंडित, प्रसिद्ध कवयित्री, लेखिका व शामलाक्षरी काव्य निर्मितीकार, नागेश्वर विद्यालय चिखली पर्यवेक्षिका यांनी स्पर्धेचे परीक्षण केले. मा. गीता निमल यांनी उपस्थितांचे आभार मानले. सर्वांचा उत्तम प्रतिसाद लाभला.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मा .डोळस, मा. संध्या माने, मा. पिंगळे, मा. शारदा पानगे यांचे सहकार्य लाभले.















