prabodhini news logo
Home चंद्रपूर विदर्भ स्तरीय वोविनाम मार्शल आर्ट्स कॅम्प 28 डिसेंबर ला भद्रावती येथे आयोजन

विदर्भ स्तरीय वोविनाम मार्शल आर्ट्स कॅम्प 28 डिसेंबर ला भद्रावती येथे आयोजन

0
91

स्कुल गेम्स फेडरेशन आणि इंडिया(SGFI)- क्रीडा मंत्रालय भारत सरकार द्वारा मान्यताप्राप्त सेल्फ डिफेन्स मार्शल आर्ट्स वोविनाम या क्रीडा प्रकाराचा चंद्रपुर जिल्हा सह संपुर्ण विदर्भा विभागात प्रसार करण्याच्या एकमात्र उद्देशाने भव्य एक दिवसीय विदर्भ स्तरीय वोविनाम रेफरी, जज ट्रेनिंग कोर्स ( 15 वर्षांवरील सर्व स्त्री.. पुरुष कोचेस , क्रीडा शिक्षक यांच्या करीता) व विदर्भ स्तरीय वोविनाम स्टुडंट्स ट्रेनिंग कॅम्प (06 ते 60 वर्षे वयोगटातील सर्व इंटरेस्टिंग स्टुडंट्स, स्त्री पुरुष यांच्या करीता ) चे आयोजन दिनांक 28 डिसेंबर 2025 रविवार सकाळी 08 वाजता पासुन स्थानिक तालुका क्रीडा संकुल,भद्रावती, चंद्रपुर येथे करण्यात आले आहे.
या कॅम्प ला मुख्य कोच म्हणून आदरणीय मास्टर श्री शंकर महाबळे सर (वोविनाम वर्ल्ड कप मध्ये मागील 07 वर्षांपासून व मागील 04 वर्षांपासून आशियाई वोविनाम स्पर्धा मधे सतत भारतीय संघाचे टीम कोच म्हणून सुप्रसिद्ध मार्शल आर्ट्स एक्सपर्ट,छत्रपती संभाजी नगर,महाराष्ट्र (संस्थापक व अध्यक्ष- वोविनाम असोसिएशन ऑफ महाराष्ट्र ® जनरल सेक्रेटरी वोविनाम फेडरेशन ऑफ इंडिया, नवी दिल्ली तसेच मार्शल आर्ट्स एक्सपर्ट कोच मास्टर संजय बनसोडे सर( इंटरनॅशनल सिलंबम एक्सपर्ट कोच , वोविनाम टेक्निकल अधिकारी, पुणे) यांना निमंत्रित करण्यात आले आहे.
संपुर्ण विदर्भात मार्शल आर्ट्स, सेल्फ डिफेन्स कला खेळांना चालना देणारे ज्येष्ठ क्रीडा संघटक, मार्गदर्शक व मार्शल आर्ट्स कोच दुर्गराज एन रामटेके, विदर्भ विभाग प्रमुख वोविनाम असोसिएशन ऑफ महाराष्ट्र ®
वोविनाम फेडरेशन ऑफ इंडिया ®, नवी दिल्ली.
यांच्या नेतृत्वाखाली या कॅम्प चे आयोजन करण्यात येत आहे.

व्हियेतनाम या देशाच्या जगातील मिलिटरी ट्रेनिंग सुप्रसिद्ध मार्शल आर्ट्स क्रीडा प्रकारात, मान्यताप्राप्त भारतीय शालेय क्रीडा प्रकारात वोविनाम मधे महाराष्ट्र राज्यातील खेळाडू यांचे उज्ज्वल भविष्य निर्माण करण्यासाठी या कॅम्प चे आयोजन करण्यात येत आहे.

या कॅम्प मध्ये प्रवेश नोंदणी करण्यासाठी दिनांक 26 डिसेंबर पुर्वी..9067758618 या मोबाईल क्रमांक वर व्हॉट्सअँप द्वारा संपर्क साधावा असे आव्हान चंद्रपुर डिस्ट्रिक्ट अमेचुअर वोविनाम असोसिएशन व आयुषी स्पोर्ट्स अकादमी, चंद्रपुर चे पदाधिकारी शीतल रामटेके, बबिता गेडाम, किरण राजुरकर,बी एल करमनकर, संजय माटे,गणेश राठोड, अशोक कामडे, राकेश कुमार राय, संदीप पंधरे, करण डोंगरे, सुरज मेश्राम, पांडुरंग भोयर,आकाश वाघमारे, तन्नू आडे, पुनम श्यामकुळे,गौतम भगत, स्वप्नील ठाकरे, गौरव धाकडे यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here