
कुमुद फुलझेले महिला जिल्हा प्रतिनिधी नागपूर – वृद्ध कलावंतांची लोकसंख्या लक्षात घेता आतापर्यंत सुरू असलेले वार्षिक शंभर चे इष्टांक रद्द करून त्या ऐवजी वार्षिक 500 कलावंतांची निवड करणे याकरिता दि. 26/12/2025 ला नागपूर जिल्हाधिकारी साहेबांना निवेदन देण्यात आले. त्यावेळी अखिल भारतीय लोककलावंत सांस्कृतिक समितीच्या अध्यक्षा सारिका उराडे, समितीच्या सचिव कोमल पारोधी , विजयदादा मधुमटके ऑरेंज सिटी म्युझिकल ग्रुप, अनिल मेश्राम सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.

त्याचप्रमाणे जया धाबेकर ज्योती फूडे,सुषमा बोकडे वनिता चिंचोलकर कमला नवघरे कांता ब्राह्मणकर रजनी देशमुख सरोज चांडोल शालु बरई,वंदना चिंचोलकर ममता मैद ,रत्नमाला दांडेकर, निर्मला लिलोरे ,लता दांडेकर ,कुसुम भांडेकर, सुनीता भांडेकर, माया लहाने, रेखा कीरमीरे, गीता नैताम ,शालिनी दयाळ, सरस्वती वायाळ, मंदा गाणार, संगीता बिरोले, प्रमिला कराडे ,लता येवले ,रत्ना शिरुळकर, कांता जयस्वाल, नलू पुसे इत्यादींनी हजेरी लावली. जिल्हाधिकारी साहेबांनी सकारात्मक भूमिका दर्शवल्याबद्दल सर्वांनी त्यांच्या आभार मानले.















