prabodhini news logo
Home चंद्रपूर भाजपच्या कोट्यवधींच्या विकासाच्या थापा खोट्या आहेत; भाजपने चंद्रपूर शहराची पुरती वाट लावली!

भाजपच्या कोट्यवधींच्या विकासाच्या थापा खोट्या आहेत; भाजपने चंद्रपूर शहराची पुरती वाट लावली!

0
50

रवि आत्राम तालुका प्रतिनिधी चंद्रपूर – चंद्रपूर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्र. १५ (विठ्ठल मंदिर ) येथे आयोजित प्रचार सभेत उपस्थितांशी संवाद साधला.

भाजप चंद्रपूर मनपा काबीज करण्यासाठी ज्या २२०० कोटी रुपयांच्या विकासाचा पाढा वाचत आहे, तो पूर्णतः खोटारडेपणाचा असून अमृत योजना व भूमिगत योजनेत प्रचंड भ्रष्टाचार झाला आहे. या योजनांतून सामान्य नागरिकांना काहीच लाभ मिळाला नाही, मात्र भाजपचे सत्ताधारी व कंत्राटदार मालामाल झाले.

आजही शहरात पिण्याच्या पाण्याची समस्या, सांडपाणी विल्हेवाट, पथदिवे, रस्ते, शिक्षण व आरोग्याच्या समस्या कायम आहेत. काँग्रेसला संधी दिल्यास मनपा अंतर्गत नागरिकांच्या प्रश्नांना पूर्णविराम देण्यासाठी ठोस काम केले जाईल. गोरगरिबांच्या मुलांसाठी मोफत इंग्रजी शिक्षण, प्रशस्त रुग्णालये, शुद्ध पेयजल, स्वच्छ रस्ते व नियोजनबद्ध सांडपाणी व्यवस्था उभारली जाईल, असा शब्द दिला.

यावेळी प्रभाग १५ मधील काँग्रेसचे अधिकृत उमेदवार शोभा शरदचंद्र वाघमारे, राजू गजानन बनकर, राधा प्रफुल्ल पुलगमकर व सौरभ अरुण ठोंबरे यांच्या प्रचारार्थ ही सभा पार पडली.

चंद्रपूरच्या विकासासाठी, भ्रष्टाचारमुक्त मनपासाठी काँग्रेसच्या सर्व उमेदवारांना बहुमतांनी विजयी करा!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here