
जनतेनी मांडल्या समस्या
सिरोंचा प्रतिनिधी प्रबोधिनी न्युज नेटवर्क : तालुक्यातील नरसिंहपल्ली येथे जाहीरसभाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी परिसरातील नागरिक व राष्ट्रवादी (अजित पवार) च्या कार्यकर्त्यांनी परिसरातील समस्या आमदारांच्या लक्षात आणून दिल्या.
रेंगुठा येथे १२१ कोटी रुपयांचा उपसा सिंचन प्रकल्प प्रगतीपथावर आहे. या प्रकल्पासाठी स्वतंत्र ३३ केव्ही सबस्टेशन मंजूर झाले असून, त्याचा निधीही प्राप्त झाला आहे. याशिवाय रेंगुठा गावासाठी स्वतंत्र सबस्टेशन आणि बामणी येथून नवीन वीज खांब टाकण्याच्या कामाला सुरुवात झाली, अशी माहिती आमदारांनी दिली.
या जाहीर सभेला राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष मधुकर कोल्लुरी, कार्यकारी जिल्हाध्यक्ष बानय्या जनगाम, नगरसेवक सतीश भोगे, जगदीश रालबंडीवार, सतीश राचर्लावार,किष्टया पोरतेट,सरपंच कमला गेडाम, सरपंच लक्ष्मण गावडे,सरपंच अजय आत्राम, सरपंच शंकर रत्नम,सत्यनारायण परपटलावार मधुकर मडावी, महिला जिल्हा उपाध्यक्ष वेंकटलक्ष्मी आरवेल्ली, नीलम रामकिष्टू,नरेश संगर्ती,राष्ट्रवादी काँग्रेस सोशल मीडिया प्रतिनिधी तिरुपती चिट्याला यांच्यासह नरसिंहपल्ली परिसरातील राष्ट्रवादी काँग्रेस (अप)गटचे पदाधिकारी व कार्यकर्ते आणि शेकडो नागरिक उपस्थित होते.















