prabodhini news logo
Home चंद्रपूर सेवेचा संकल्प, आरोग्याची जाणीव व क्रीडेला चालना देणाऱ्या सावरगावातील युवकांचे कार्य प्रेरणादायी…

सेवेचा संकल्प, आरोग्याची जाणीव व क्रीडेला चालना देणाऱ्या सावरगावातील युवकांचे कार्य प्रेरणादायी…

0
96

सावरगाव येथे सामाजिक उपक्रमांचे उद्घाटन!

तृप्ती चिद्रावार कार्यकारी संपादिका प्रबोधिनी न्युज – समाजहित, आरोग्यसंवर्धन आणि युवकांच्या क्रीडाविकासाला प्राधान्य देत सामाजिक कार्याचा व सेवाभावी वारसा जपत शौर्य क्रीडा मंडळ सावरगाव व विनोद बोरकर मित्र परिवार यांच्या संयुक्त विद्यमाने सावरगाव येथे आयोजित भव्य रक्तदान शिबिर, आरोग्य तपासणी शिबिर, मोफत चष्मे वाटप व कबड्डीच्या महासंग्राम स्पर्धेचे उद्घाटन केले.

या आयोजित उद्घाटन सोहळ्यास कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून माजी सभापती प्रफुल खापर्डे, आयोजक तथा लक्ष्मी नागरी पतसंस्था अध्यक्ष विनोद बोरकर, खोजराम मारसकोल्हे , शरद सोनवणे, रविद्र निकुरे, देवेंद्र गेडाम, स्वप्नील कावळे, प्रणया गड्डमवार, नैना गेडाम, दिलीप गायकवाड, यदुनाथ लेंझे, प्रमोद गायकवाड, लिलाधर बोरकर, राजेश बारासगडे, देविदास बोरकर, सुभाष गजभे,गुरुदास चावरे, भारत चुनारकर, यशवंत कायरकर, अनिल बोरकर, प्रदीप येसनसुरे, गिरीधर निकुरे आदी मंचावर उपस्थित होते.

रक्तदान ही सर्वश्रेष्ठ समाजसेवा आहे, आरोग्य तपासणी आणि मोफत चष्मे वाटपामुळे गरजू नागरिकांना मोठा दिलासा मिळतो. निरोगी समाज घडवायचा असेल तर अशा उपक्रमांची नितांत गरज असल्याचे नमूद केले. युवकांनी नियमित रक्तदान करण्याचे आणि आरोग्याबाबत जागरूक राहण्याचे यावेळी आवाहन केले. तर “क्रीडा स्पर्धांमुळे युवकांमध्ये शिस्त, संघभावना आणि नेतृत्वगुण विकसित होतात. आरोग्यदृष्ट्या सक्षम पिढी घडविण्यासाठी खेळांना प्रोत्साहन देणे आवश्यक असल्याचे नमूद केले.

तत्पूर्वी सामाजिक कार्यकर्ते तथा लक्ष्मी नागरिक पतसंस्थेचे अध्यक्ष विनोद बोरकर यांनी समाज घडविण्यात युवकांची महत्त्वपूर्ण भूमिका, एक सहृदय लोकनेता म्हणून ब्रह्मपुरी विधानसभा क्षेत्रासह चिमूर विधानसभा क्षेत्रात मी केलेल्या सामाजिक कार्याची माहिती भविष्यात 10 हजार गरजूंना चष्मे वाटपाचा संकल्प यावर आपल्या प्रास्ताविकातून विस्तृत माहिती दिली.

आरोग्य तपासणी शिबिरात तज्ज्ञ डॉक्टरांच्या पथकाद्वारे सर्वसाधारण तपासणी, रक्तदाब, साखर तपासणीसह विविध आजारांची प्राथमिक तपासणी करण्यात आली. गरजू नागरिकांना मोफत चष्म्यांचे वाटप करून त्यांच्या दैनंदिन जीवनातील अडचणी दूर करण्याचा प्रयत्न करण्यात आला. याचवेळी आयोजित कबड्डी महासंग्राम स्पर्धेचे उद्घाटन केले.

या कार्यक्रमाला स्थानिक पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते, वैद्यकीय अधिकारी, युवक-युवती आणि नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. सामाजिक सेवेचा, आरोग्यजागृतीचा आणि क्रीडाविकासाचा त्रिवेणी संगम साधणारा हा उपक्रम सर्वत्र कौतुकाचा विषय ठरला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here