
हिंगोली प्रतिनिधी प्रबोधिनी न्युज नेटवर्क – वसमत : दिनांक 26 जानेवारी 2026 रोजी प्रशाला जवळाबाजार येथे सकाळी आठ वाजून वीस मिनिटाला ध्वजारोहण कार्यक्रम प्रशालेचे मुख्याध्यापक राठोड, केंद्रीय प्राथमिक शाळा जवळाबाजार येथील मुख्याध्यापक, प्रशा उर्दू मुख्याध्यापक जावेद व तिन्ही शाळेचे शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष उपाध्यक्ष व केंद्रप्रमुख कादर सर यांनी प्रतिमेचे पूजन केले आणि ध्वजारोहण राठोड यांच्या हस्ते करण्यात आले त्यानंतर तिन्ही शाळा मिळून सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन केले यात सर्वोत्कृष्ट नृत्य, पाणी हरवले हे भारुड, सौगंध इस मिट्टी की हे गीत आणि उत्कृष्ट अशी भाषणे प्रशाला जवळा बाजार येथील विद्यार्थ्यांनी केले त्यात लक्ष्मी खंदारे, गणेश जाधव समर्थ वाजे देवानंद गाढवे जानवी कटारे कृष्णा जाधव समर्थ वाजे या विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला तसेच प्रथमेश लंगोटे या विद्यार्थ्यांनी इंग्लिश मधील पोएम म्हणून सुंदर आवाजात म्हणून दाखवली केंद्रीय प्राथमिक शाळा जवळा बाजार व हायस्कूल जवळा बाजार सुंदर अशी लेझीम कवायत याचे सादरीकरण केले सारे जहाँ से अच्छा हिंदुस्तान हमारा हे सुंदर नृत्य प्राशा उर्दू जवळा बाजार यांनी सादर केले या कार्यक्रमाचे सुंदर असे सूत्रसंचालन पाटील यांनी केले हा संस्कृतिक कार्यक्रमासाठी मुळे, वर्षा, कराड, पटले, सोनवणे, भोसले, साखरे, पावडे व पाटील यांनी सहभाग नोंदविला. यानंतर माजी विद्यार्थी संघ यांची बैठक घेण्यात आली या बैठकीमध्ये लोकसहभाग निधी, विद्यार्थ्यांची गुणवत्ता विकास, स्वच्छता, इत्यादी मुद्द्याचा विचार करून माजी विद्यार्थ्यांचे बँक खाते तयार करून ताबडतोब माजी विद्यार्थ्यांनी निधी जमा केला मुलांचा सहभाग म्हणून देवीला यात गणेश शेटे शिवम परिवार संजय पारदे इत्यादी विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला मार्गदर्शन श्रीमती पाटील मॅडम यांनी मुलांना केले तसेच काही सूचना व तयारी मार्गदर्शन श्री राठोड सर यांनी केले शेवटी आभार प्रदर्शन श्रीमती पाटील मॅडम यांनी केला. Student of the year 2015_2026 प्रमाणपत्र वितरण करण्यात आले यात इयत्ता दहावीचा विद्यार्थी शेख और सलान रिजवान आणि दुसरा विद्यार्थी नी लक्ष्मीखंदारे यांना प्रमाणपत्राचे वितरण करण्यात आले..















