
24 तासाचे आत उडकीस स्थानिक गुन्हे शाखा, यवतमाळची कारवाई
मारेगाव प्रतिनिधी प्रबोधिनी न्युज नेटवर्क – यवतमाळ जिल्ह्यात वाढत्या शेती अवजारे चोरीचे प्रमाण माहता मा. पोलीस अधिक्षक यवतमाळ, यांनी गुन्हे उघडकीस आनण्याच्या सुचना स्थानिक गुन्हे शाखा, यवतमाळ यांना दिल्या होत्या, दिनांक 27/01/2026 रोजी पोलीस ठाणे मारेगांव, जिल्हा यवतमाळ येथे फिर्यादी श्री लक्ष्मन तात्याची नांदे, रा. पहापळ, ता. मारेगांव, जिल्हा यवतमाळ यांनी पोलीस ठाणे मारेगांव येथे लेखी रिपोर्ट दिला की, त्यांचे शेतात ठेवलेले, शेती करीता कामी येणारे यंत्र रोटावेटर हे कोणी तरी अज्ञात चोरट्याने चोरुन नेले आहे. अश्या रिपोर्ट वरुन पोलीस ठाणे मारेगांव येथे अपराध क्रमांक 28/2026 कलम 303 (2) भारतीय न्याय संहीता अन्वये गुन्हा दाखल झाला होता. सदर गुन्ह्याचे घटणास्थळी भेट देवुन दाखल झालेल्या गुन्ह्याचा समांतर तपास करीत असतांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला गोपणीय माहीती मिळाली की, सदरची चोरी ही पहापळ गावात राहणारा इसम अमोल थेरे याने केली आहे. सदर माहीतीची खात्री करणे करीता अमोल थेरे याला ताब्यात घेवुन घटणे संबंधाने सविस्तर विचारपुस केली असता त्याने फिर्यादी लक्ष्मन नांदे यांचे शेतातुन शक्तिमान कंपनीचे रोटावेटर त्याचा मित्र प्रज्वल घाटे, रा. गोदनी, ता. मारेगांव याचे मदतीने चोरुन ते रोटावेटर प्रज्वल घाटे याचे घरा समोर नेवुन ठेवले आहे असे सांगीतल्याने प्रज्वल घाटे, रा. गोदनी, ता. मारेगांव याचे घरी जावुन त्याला ताब्यात घेवुन त्याचे घरा समोर ठेवुन असलेला चोराचा शक्तिमान कंपनीचा रोटाव्हेटर किंमत 1,40,000/- रुपये व तो रोटावेटर गोदनी गावी घेवुन जाने करीता प्रज्वल घाटे व अमोल थेरे यांनी वापरलेला प्रज्वल घाटे याचे मालकीचा Massey Ferguson 7550 Di कंनीचा ट्रॅक्टर किंमत 8,00,000/- रुपये असा एकुण 9,40,000/- रुपयाचा मुद्देमाल पंचनामा करवाई करुन जप्त करण्यात आला आहे. नमुद आरोपी 1. अमोल दिनकर थेरे, वय 37 वर्ष, रा. पहापळ, ता. मारेगांव, जि. यवतमाळ 2. प्रज्वल नरेंद्र घाटे, वय 20 वर्ष, रा. गोदणी, ता. मारेगांव, जि. यवतमाळ यांना पुढील कायदेशीर कारवाई करीता पोलीस ठाणे मारेगांव यांचे ताब्यात देण्यात आले. पुढील तपास पोलीस ठाणे मारेगांव करीता आहे.
सदरची कारवाई ही मा. पोलीस अधिक्षक श्री कुमार चिंता, अपर पोलीस अधिक्षक श्री अशोक थोरात यांचे मार्गदर्शनात पोना सतीश चवरे स्थागुशा यवतमाळ, सपोनि दत्ता पेंडकर, अंमलदार सुनील खंडागळे, सुधीर पांडे, निलेश निमकर, सुधीर पिदुरकर, सतीश फुके सर्व स्थानिक गुन्हे शाखा, यवतमाळ यांनी यशस्विरीत्या पार पाडली.















