
कोरची प्रतिनिधी प्रबोधिनी न्युज नेटवर्क : येथील शासकीय माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रम शाळेत ७७ वा प्रजासत्ताक दिन अत्यंत उत्साहात आणि विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला. या निमित्ताने शाळेत पालक मेळावा आणि स्नेहसंमेलनाचेही आयोजन करण्यात आले होते, ज्याला पालकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
कार्यक्रमाचे अध्यक्षपद शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष हिरालाल उईके यांनी भूषवले. प्रमुख अतिथी म्हणून शाळेच्या माजी विद्यार्थिनी तथा सध्याच्या तालुका क्रीडा अधिकारी मंगला शेंडे उपस्थित होत्या. मान्यवरांच्या उपस्थितीत शाळेचे मुख्याध्यापक उमाकांत यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
सांस्कृतिक कार्यक्रमातून सादर केले ‘विविधतेत एकता’ विद्यार्थ्यांमधील सुप्त गुणांना वाव देण्यासाठी आयोजित स्नेहसंमेलनात विद्यार्थ्यांनी भारतीय संस्कृतीचे दर्शन घडवले.

यात प्रामुख्याने:
मराठी, गुजराती, छत्तीसगढी,गोंडी, राजस्थानी आणि पंजाबी लोकनृत्यांचे सादरीकरण करण्यात आले. विद्यार्थ्यांनी आपल्या कलाकृतीतून विविध प्रांतांच्या संस्कृतीचा बहारदार आविष्कार सादर केला. त्याचबरोबर पालक आणि शिक्षकांमधील सुसंवाद वाढवण्यासाठी विशेष चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते.कार्यक्रमाचे सुरेख सुत्रसंचालन इयत्ता अकरावची विद्यार्थ्यांनी कु.संचिता हुपुंडी हिने केले कार्यक्रमासाठी उपस्थित पालक व पाहुण्यांचे विशेष आभार अरुण कायंदे यांनी केले.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सांस्कृतिक प्रमुख गीता राऊत, प्रीती खंडात, धनश्री परतेती आणि सुषमा आंबोणे,भारती साखरे,सुमन अडभैया, चंद्रकला पटले यांनी विशेष परिश्रम घेतले. तसेच शाळेतील शिक्षक वृंद व कर्मचारी:
यावेळी शाळेतील हरेश कामडी, अभिमन्यू वाटगुरे, राहुल अंधारे, कृष्णा गावडे, मनोज गजभिये,अरुण कायंदे,प्रमोद शंभरकर भैयालाल कुरसंगे,गुरुराज मेंढे,कुणाल गोवर्धन, संतोष सहारे, अमित मेश्राम,भूमेश शेंडे, मयूर दोनाडकर ओमप्रकाश रहिले, प्रथमेश पाटोळे, सुधाकर पुसाम,नैना येगंलवार, मनोज आचार्य आणि अधीक्षक डाकराम ठाकरे,सीमा कुरेकार यांनी कार्यक्रमाच्या नियोजनात मोलाचे सहकार्य केले. तसेच कोरची परिसरातील बहुसंख्येने पालक उपस्थित होते.
उपस्थित पालकांसाठी शाळेच्या वतीने भोजनाची उत्तम व्यवस्था करण्यात आली होती. मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या पालकांनी विद्यार्थ्यांच्या कलागुणांचे कौतुक करत कार्यक्रमाचा आनंद लुटला.















