prabodhini news logo
Home ठळक बातम्या वंचित बहुजन आघाडीचा नांदेड जिल्ह्यात संवाद बैठक दौरा; निवडणुकीसाठी ‘गाव तिथे शाखा’...

वंचित बहुजन आघाडीचा नांदेड जिल्ह्यात संवाद बैठक दौरा; निवडणुकीसाठी ‘गाव तिथे शाखा’ अभियानावर भर

0
116

नांदेड प्रतिनिधी प्रबोधिनी न्युज नेटवर्क – आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडी, नांदेड दक्षिण च्या वतीने जिल्ह्यामध्ये दोन टप्प्यांत भव्य ‘संवाद बैठक’ दौऱ्याचे आयोजन करण्यात आले होते. या दौऱ्याच्या माध्यमातून प्रत्येक तालुक्यात संघटन बांधणी, ‘गाव तिथे शाखा’ आणि युवकांना सक्रिय सभासद करून घेण्याचे आवाहन जिल्हा पदाधिकाऱ्यांच्या वतीने करण्यात आले आहे.

निवडणुकीच्या रणधुमाळीसाठी सज्ज होत असताना, पक्षाने दोन टप्प्यांत तालुकानिहाय बैठका घेतल्या:

पहिला टप्पा (२१ जानेवारी २०२६): कंधार, लोहा आणि नांदेड दक्षिण या तालुक्यांमध्ये कार्यकर्त्यांशी संवाद साधण्यात आला.

दुसरा टप्पा (२४ जानेवारी २०२६): नायगाव, देगलूर आणि मुखेड या तालुक्यांमध्ये बैठकांचे आयोजन करण्यात आले होते.

संघटन बांधणी आणि निवडणुकीवर ‘चिंतन’
या सर्व बैठकांमध्ये आजी-माजी पदाधिकाऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवली. आगामी निवडणुकीला सामोरे जाताना पक्षाची ताकद कशी वाढवता येईल, यावर सखोल चर्चा करण्यात आली. प्रामुख्याने तालुकानिहाय संघटन बांधणी, बुथ कमिटीची स्थापना आणि पक्षाच्या ध्येयधोरणांची पुनर्बांधणी या विषयांवर चिंतन करण्यात आले.

जिल्हाध्यक्ष शंकर महाजन आणि जिल्हा महासचिव रवी पंडित यांनी उपस्थित कार्यकर्त्यांना निवडणुकीच्या रणनीतीबाबत सखोल मार्गदर्शन केले. या दौऱ्यात जिल्हा व स्थानिक पातळीवरील अनेक दिग्गज पदाधिकारी सहभागी झाले होते.

विनायक गजभारे, संजय टिके, रंगनाथ गजले, अरुण भद्रे, पवन कांबळे, भगवानराव हनमंते, डॉ. राम वनंजे, विद्यानंद पवळे, गौतम डुमणे, नामदेव पांचाळ, गणपत सोनकांबळे, जयकुमार ढवळे, रत्नपाल माने व इतर स्थानिक पदाधिकाऱ्यांचा समावेश होता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here