
वसमत तालुक्यातील सातेफळ येथील महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाची स्वायत्त संस्था डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था बार्टी,पुणे. यांच्यामार्फत बार्टी महासंचालक सुनील वारे, निबंधक विशाल लोंढे, विभागीय व्यवस्थापक डॉ. जोगदंड व प्रकल्प व्यवस्थापक सुमेध थोरात सर हिंगोली जिल्हा प्रकल्प अधिकारी सिध्दार्थ गोंवदे यांच्या मार्गदर्शनाखाली वसमत तालुका समातादुत, मिलींद आळणे गुरुनाथ गाडेकर 26 नोव्हेंबर ते 26 जानेवारी संविधान अमृत महोत्सव या दिनानिमित्त सातेफळ येथील कै. दिनानाथ मंगेशकर माध्यमिक विद्यालय येथे निबंध स्पर्धेचे आयोजन केले होते. यामध्ये सर्वोत्कृष्ट आलेल्या विद्यार्थ्यांचे सन्मानपत्र व सन्मान चिन्ह देऊन त्यांचा सत्कार कार्यक्रम आज सातेफळ येथील दिनानाथ मंगेशकर माध्यमिक शाळा सातेफळ साजरा केला.यावेळेस महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला अभिवादन करून या कार्यक्रमाची सुरुवात करून गाडेकर गुरुनाथ यानी बार्टी मार्फत राबवित असलेल्या योजना बाबत मार्गदर्शन केले.याप्रसंगी या कार्यक्रमाचे अध्यक्ष विद्यालयाचे मुख्याध्यापक मा. एन. एन. रावले होते. तर सहशिक्षक एस. पि. बोराळकर, पी.जी. जाठोरे, वाय. एम. ढगे,एन. एन. राऊत, पी.डी. कोल्हे, आर. पी. सुम नरवाडे,भागवत भोसले आदी मान्यवर उपस्थित होते याप्रसंगी विद्यार्थी,विधार्थीनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.















