prabodhini news logo
Home गडचिरोली राज्यस्तरीय “महामृत्युंजय वाङ्मय स्पर्धा २०२६” साठी प्रस्ताव पाठविण्याचे आवाहन

राज्यस्तरीय “महामृत्युंजय वाङ्मय स्पर्धा २०२६” साठी प्रस्ताव पाठविण्याचे आवाहन

0
130

नम्रता सरदार मुख्य संपादिका प्रबोधिनी न्युज नेटवर्क – नाट्यश्री साहित्य कला मंच, गडचिरोली या संस्थेतर्फे राज्यस्तरीय महामृत्युंजय वाङ्मय स्पर्धा -२०२६ चे आयोजन करण्यात आले आहे.
नाट्यश्री तर्फे साहित्यिकांच्या साहित्यकृतींना प्रेरणा मिळावी, या उद्देशाने हा उपक्रम सुरू करण्यात आलेला असून गेल्या दोन वर्षात अनुक्रमे ३६ व ३३ साहित्यिकांना पुरस्कृत करण्यात आले असून १९ साहित्यिकांना उत्तेजनार्थ पुरस्काराने गौरविण्यात आले आहे.
या “राज्यस्तरीय महामृत्युंजय वाङ्मय पुरस्कार- २०२६” साठी दि. १ जानेवारी २०२५ ते ३१ डिसेंबर २०२५ या कालावधीत प्रकाशित झालेले मराठी भाषेतील साहित्य स्विकारले जाईल. तरी १)कादंबरी, २)कथासंग्रह, ३) कवितासंग्रह/ गझलसंग्रह, ४) समीक्षा किंवा संपादन, ५) नाटक/एकांकिका, किंवा नाट्यविषयक ग्रंथ, ६) आत्मकथन, आत्मचरित्र किंवा चरित्रग्रंथ, ७) ललीत/ वैचारिक लेखसंग्रह/ प्रवासवर्णन, ८) बाल /कुमार साहित्य व ९) संकिर्ण या वाङ्मय प्रकारातील प्रस्ताव मागविण्यात येत आहेत. रोख रक्कम, आकर्षक सन्मानचिन्ह आणि सन्मानपत्र असे पुरस्काराचे स्वरूप असून इच्छुक साहित्यिकांनी आपल्या साहित्यकृतीच्या २ प्रती व अल्पपरिचय, केवळ पोस्टानेच चुडाराम बल्हारपुरे (नाटककार),महामृत्युंजय निवास,वार्ड क्रं.१७,राधे बिल्डिंगच्या मागे,चामोर्शी रोड, गडचिरोली पिन- ४४२६०५ (म.रा.), भ्रमणध्वनी क्र . ९६२३६६३४३५, या पत्त्यावर ३० जून २०२६ पर्यंत पाठवावे असे आवाहन संस्थेचे संचालक/संस्थापक चुडाराम बल्हारपुरे यांनी एका निवेदनाद्वारे केलेले आहे. (पुरस्कारप्राप्त साहित्यिक यांना पोस्टाने पुरस्कार पाठविल्या जाणार नाही. पुरस्कार वितरण सोहळ्यास स्वखर्चाने प्रत्यक्ष उपस्थित राहावे लागेल. त्यासाठी संमेलनशुल्क,सहभाग शुल्क किंवा इतर कोणतेच शुल्क आकारले जाणार नाही.)
(पुस्तके मिळताच व्हाट्सअप वर वैयक्तिकरित्या पोच दिल्या जाईल व यथावकाश निकालही कळविला जाईल.)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here