prabodhini news logo
Home ठळक बातम्या नांदेड येथे विसावे विद्रोही मराठी साहित्य संमेलन; निमंत्रितांच्या कविसंमेलनासाठी शिवा प्रधान यांची...

नांदेड येथे विसावे विद्रोही मराठी साहित्य संमेलन; निमंत्रितांच्या कविसंमेलनासाठी शिवा प्रधान यांची निवड

0
175

प्रशांत रामटेके संपादक प्रबोधिनी न्युज नेटवर्क – विसावे विद्रोही मराठी साहित्य संमेलन, नांदेड येथे होणाऱ्या तीन दिवसीय साहित्य महोत्सवात अमरावतीचे ज्येष्ठ कवी व साहित्यिक शिवा प्रधान यांची निमंत्रितांच्या कविसंमेलनासाठी निवड झाली आहे. संमेलनाच्या अकराव्या सत्रात ते आपली कविता सादर करणार आहेत.
विदर्भातील नामवंत कवी, “समतेचे प्रभातकार” म्हणून ओळखले जाणारे शिवा प्रधान हे अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद अमरावती विभागाचे अध्यक्ष आहेत. त्यांच्या निवडीमुळे विदर्भातील साहित्यविश्वात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
या संमेलनात मराठी कविता, विद्रोही कविता आणि विविध साहित्यप्रकारांची रेलचेल असणार आहे. राज्यभरातील साहित्यिक, कवी आणि अभ्यासक यांचा सहभाग अपेक्षित आहे.
शिवा प्रधान यांच्या निवडीबद्दल प्रा. डॉ. श्रीकांत बनसोड, प्रा. डॉ. इंद्रजित ओरके, प्रा. डॉ. संतोष बनसोड, प्रा. डॉ. प्रकाश जंवंजाळ, प्रा. डॉ. अभिजीत प्रधान, डॉ. वसुधा प्रधान, अभियंता उमेश शहारे, अॅड. महेंद्र तायडे, प्रा. डॉ. शोभा रोकडे, डॉ. देविदास मेटांगे, प्रा. टी.बी. रामटेके, प्रा. रेखा पर्वतकर, विजय जिचकार, प्रा. डॉ. अजय खडसे, पद्माकर मांडवधरे, भोजने, किशोर ढमाले, प्रा. एस. कुमार मेश्राम, देविदास भोरे, सुधाकर पाटील, राज इंगळे, गौतम गूळधे, प्रा. डॉ. संजय खडसे, स्नेहल अभ्यंकर, बाबुलाल शिरसाट, डॉ. जयकुमार चर्जन, प्रा. डॉ. प्रफुल गवई, प्रा. अरुणा तसरे, प्रा. डॉ. अशोक शिरसाट, प्रा. डॉ. अनिता धूर्वे आदी मान्यवरांनी अभिनंदन केले आहे.
शिवा प्रधान यांच्या निवडीमुळे अमरावती व विदर्भाच्या साहित्य परंपरेचा मान उंचावला असून, त्यांच्या काव्य सादरीकरणाकडे साहित्यप्रेमींचे लक्ष लागले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here