prabodhini news logo
Home गडचिरोली लेख – अंहकार 

लेख – अंहकार 

0
123

जीवनात सुख दुःखांचा व जन्म मृत्यू चा मधील जीवन जगत असतो मनुष्य…. प्रत्येक व्यक्ती वेगळं आयुष्य असतं.. कोणी सुखात तर कोणी दुःखात…हा अनुभव प्रवास घेऊन समाजात वावरताना बरीच वादळ आयुष्यात येतात…. आपल्या प्रयत्नांनी कोणी यशस्वी होतो..व सर्व सुरळीत जगतोय.. श्रीमंत गरीब व मध्यमवर्गीय कुटुंबात जन्मलेल्या व्यक्तींचा आयुष्य वेगळं असतें…. या आपल्या छोट्या शा अनुभव घेऊन बरंच काही शिकायला मिळाले…. साधेपणा जगणं आयुष्याच आंनद घेत जगणं खुप समाधान देणारे क्षण असतो… काही व्यक्ती खूप मनानं अंहकारात जगतोय.. सर्व काही असणं म्हणजे सुख नाही.. कधी तरी अशी वेळ येते आपल्या चांगले वाईट कर्माचे फळ आपल्याला बरंच शिकवून जाते.. म्हणून.जमिनीवर पाय ठेवून आकाशात उंच भरारी अवश्य घ्यावी…पण स्वच्छंद मन ठेऊन…. आयुष्य जगण्याचा प्रयत्न निष्फळ मनानं करावं.. त्याचं आंनद समाधान देणारे असते.. आजच्या काळात गुंतागुंतीच्या धकाधकीच्या जीवनात वेळेस फार महत्त्व आहे.. जगात फार विचित्र परिस्थिती निर्माण झाली आहे… कलियुगात विकसित तंत्रज्ञान यामुळे मानवी जीवन खूप बदलले आहे… माणसाला माणुसकीची नाती गोती उरली नाही.. तात्पुरता दिलासा मिळतो… व्यक्ती ला… विचारसरणी बदलली आहे..
अंहकार भरलाय मी माझं म्हणून… स्वतः चा स्वार्थ साधण्यासाठी रक्ताच्या नात्यात दुरावा निर्माण करते आहे…
माणसाचं जीवन आज आहे उद्या नाही.. बोलता चालता केव्हा या जगाचा निरोप घेतला जाईल..हे क्षणभंगुर जीवन आहे.. सर्व परिस्थिती माहीत असुनही मनुष्य कोणत्या भ्रमात जगतोय… सर्व काही इथंच ठेवून जावे लागते.. मायेच्या बाजारातून खाली हाताने…. शेवटी आठवणीच राहतात कायमस्वरूपी…. मनाच्या पलीकडे आहे सर्व पंचतत्वात विलिन होणारं….परत कधीही न
भेटणारे…. मानवी जीवन…

सौ. सोनम वाढई गडचिरोली

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here