
जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा… सखीनो….
स्री मनाची अवस्था कोण जाणे?
पण तीच्या शिवाय आयुष्याला अर्थ नाही,गती नाही.घरालाही घरपणं नाही.काहीच सोप नसत स्त्री ची रूपे अनेक आहेत.आजी,आई, बहीण, पत्नी, इतर सर्व नात्यात गुरफडलेली ती फक्त तिच असतें.तिचं दुःख व्यक्त करता येईल अशी जागाही आजुन निर्माण झाली नाही. स्री साठी काहीही सोपं नसतं आपलं काम चोख पार पाडत सर्वत्र तिचं अस्तित्व असते.
दूरवर स्त्री ची किर्ती प्राप्त होईल अशी कार्य प्रणाली विकसित करणे हे फक्त स्त्रीचं करते तिचं अस्तित्व हे फक्त तिच्या पुरत सिमित नसते. थोडक्यात काय स्त्री ची रूपे आपणास माहीत आहेच.तिने मनात आणल तर एक कुटुंबाचे अनेक कुटुंब जोडुन ठेवते पणं तेच वाईट विचार केला तर ती एक नाही अनेक कुटुंब तुटतील असे वागते,
हिचं स्त्री आई बनुन मुलांना चांगले शिक्षण संस्कार देते.एक चांगला नागरीक म्हणून समाजात वावरता येईल असे आपल बाळ घडवते.पतीची प्रेमिका बनुन त्याच्या सोबत सुख दुःखाचे चटके सहन करत असते की. पत्नी बनुन त्याच्या सोबत त्याला खांद्याला खांदा लावून काम करत आहे.
स्त्रीला खर कोणतीच अपेक्षा नसते हो
हवा आहे तो तिच्यावर विश्वास आणि सर्वांचे प्रेम.
अहो काही लागत नाही स्त्रीला फक्त तीला आपल समजा
चेहऱ्यावर हसू आलं पाहिजेल तीच्या डोळ्यात पाणी आणून तीला वेदना होत असल्यास तुम्हाला काय कुणालाच कळत नाही स्त्री ची व्यथा! वेदनांवर फुंकर मारणारा असावा अशी माणसे आयुष्यात असतील न तर खरच आयुष्याचं सोनं केल्या शिवाय राहणार नाही असोत..
सौ उमा परदेशी
नाशिक















