
प्रशांत रामटेके संपादक प्रबोधिनी न्युज – विश्वभूषण महामानव बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी स्थापना केलेले सामाजिक संघटन म्हणजे समता सैनिक दल. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी तिस वर्ष मानवमुक्तीचे लढे समता सैनिक दलाच्या भरवश्यावर लढले. समता सैनिक दलाला शंभर वर्ष पूर्ण होत असून शताब्दी महोत्सवानिमित्त चंद्रपूर येथे “समता सैनिक दल शताब्दी महोत्सव समिती” गठीत करण्यात आली आहे.
सदर समितीचे अध्यक्ष मा. दिलीप बावरे, उपाध्यक्ष धम्मदीप मेश्राम व अॅड. राजेश वनकर, कार्याध्यक्ष मा. गौतम येसांबरे, सचिव मा. अनंत बावरे, सहसचिव गौरव धाकडे, कोषाध्यक्ष मार्शल अमर्त्य, सह-कोषाध्यक्ष रुपेश वालकोडे, मीडिया प्रमुख निखिल येसांबरे अशा सर्वानुमते नियुक्त्या करण्यात आल्या होत्या. सदर समितीतर्फे वर्षभर विविध कार्यक्रमांचे आयोजन होणार असून दिनांक २२ मार्च २०२६ ला चक्रवर्ती प्रियदर्शी सम्राट अशोक जयंती निमित्ताने प्रियदर्शनी इंदिरा गांधी सांस्कृतिक सभागृह येथे सायंकाळी ६ ते १० वाजेपर्यंत “चक्रवर्ती प्रियदर्शी सम्राट अशोक यांच्या जीवनावर” भव्य व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते.
बौद्ध इतिहासकार तज्ञ, लेणी तथा शिल्पकला तज्ञ माननीय महेंद्र शेगावकर सर यांनी “सम्राट अशोक यांचे योगदान व आधुनिक भारतासाठी त्यांचे महत्व, धर्मांतर व बौद्ध धर्माचा जागतिक प्रसार, धार्मिक, सामाजिक व नैतिक सुधारणा, भारतीय संस्कृती, कला व बौद्ध धर्माचा प्रसार, आदर्श प्रशासक म्हणून लोककल्याणाचे कार्य, शिलालेख व स्तंभलेख यांचे महत्व आणि आधुनिक भारतात त्यांच्या विचारांची गरज” या प्रमुख मुद्द्यांवर सखोल आणि मोलाचे मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे उद्घाटक समता सैनिक दलाचे ज्येष्ठ मार्शल गौरीशंकर टिपले सर आणि समता सैनिक दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष कॅप्टन अशोक खन्नाडे सर यांनी कार्यक्रमाचे उद्घाटन करून उद्घाटनपर मनोगत व्यक्त केले. सदर व्याख्यान कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. दिलीप वावरे सर यांनी भूषविले होते, अध्यक्षीय भाषणातून त्यांनी उपस्थितांना समता सैनिक दलाचे वर्तमान काळातील महत्व विशद करून सर्वांना समता सैनिक दलाचा सभासद होण्याबाबत आवाहन केले. समितीचे उपाध्यक्ष मा. धम्मदीप मेश्राम सर आणि सचिव मा. अनंत बावरे सर यांनी शुभेच्छापर मनोगत व्यक्त केले.
सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन समितीचे कोषाध्यक्ष मार्शल अमर्त्य यांनी, तर प्रस्ताविक समितीचे सदस्य मा. दुश्यंत नगराळे सर यांनी आणि आभार समितीचे उपाध्यक्ष मा. अॅड. राजेश वनकर सर यांनी केले. सदर कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी समितीचे पदाधिकारी मा. दिलीप बावरे, मा. गौतम येसांबरे, मा. धम्मदीप मेश्राम, मा. अॅड. राजेश वनकर, मा. अनंत बावरे, मा. गौरव धाकडे, मार्शल अमर्त्य, मा. रुपेश वालकोडे, मा. निखील येसांबरे, मा. अमित वाघमारे, मा. प्रशांत रामटेके, मा. भारत मुन, मा. दुश्यंत नगराळे, मा. अल्का मोटघरे, मा. रुपाली वानखेडे, मा. धिरज तेलंग, मा. स्मिता देवगडे, मा. करुण आनंद, मा. अॅड. रविंद्र मोटघरे, मा. अजय पागडे, मा. गौतम नागदेवते, मा. रुपेश नाईक, मा. अंजली मेश्राम, मा. प्रगती मेश्राम, मा. आयुषी मेश्राम, मा. राजेश भसारकर यांनी अथक परिश्रम घेतले.















