prabodhini news logo
Home ठळक बातम्या शाहाद्याच्या ‘अचिव्हर हाईट्स’च्या विद्यार्थ्यांची गरुडझेप; चीनमधील आंतरराष्ट्रीय जंपरोप स्पर्धेसाठी निवड

शाहाद्याच्या ‘अचिव्हर हाईट्स’च्या विद्यार्थ्यांची गरुडझेप; चीनमधील आंतरराष्ट्रीय जंपरोप स्पर्धेसाठी निवड

0
116

प्रशांत रामटेके संपादक प्रबोधिनी न्युज : नाशिक येथे संपन्न झालेल्या २२ व्या राष्ट्रीय जंपरोप स्पर्धेत शाहादा येथील अचिव्हर हाईट्स इंटरनॅशनल स्कूलच्या विद्यार्थ्यांनी सुवर्णपदक पटकावत ऐतिहासिक कामगिरी केली आहे. या घवघवीत यशामुळे राहुल सुनील सुळे आणि त्यांच्या सहकाऱ्यांची चीन येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय जंपरोप स्पर्धेसाठी भारतीय संघात निवड झाली आहे.
नाशिकमध्ये रंगला थरार
महाराष्ट्र जंपरोप असोसिएशन व जंपरोप फेडरेशन ऑफ इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने २७ ते २९ मार्च २०२६ दरम्यान नाशिकच्या मीनाताई ठाकरे क्रीडा संकुलात या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत दिल्ली, उत्तर प्रदेश, कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि मध्य प्रदेश यांसह देशभरातील विविध राज्यांच्या संघांनी सहभाग नोंदवला होता.
सुवर्णमयी कामगिरी
महाराष्ट्र संघाचे प्रतिनिधित्व करताना अचिव्हर हाईट्स इंटरनॅशनल स्कूलच्या पाच खेळाडूंनी ‘सिंगल लाँग रोप स्पीड’ या प्रकारात अटीतटीच्या लढतीत प्रथम क्रमांक मिळवून सुवर्णपदक पटकावले. सुवर्णपदक विजेत्या संघात खालील खेळाडूंचा समावेश आहे:
१) राहुल सुनील सुळे
२) चैतन्य राकेश देसले
३) आदित्य जितेंद्र जमदाळे
४) अनुज दिनेश जव्हेरी
५) ओम सचिन गोसावी
चीनमध्ये फडकणार तिरंगा
राष्ट्रीय स्तरावरील या उल्लेखनीय कामगिरीमुळे या पाचही खेळाडूंची आता चीनमध्ये होणाऱ्या आंतरराष्ट्रीय जंपरोप स्पर्धेसाठी निवड झाली आहे. या यशामुळे नंदुरबार जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्राचे नाव क्रीडा नकाशावर उंचावले आहे.
कौतुकाचा वर्षाव
विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल शाळेचे चेअरमन सुमित अग्रवाल सर आणि उपप्राचार्य रोहित शिंदे सर यांनी सर्व विजेत्यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. या खेळाडूंना नंदुरबार जिल्हा जंपरोप सचिव रामा हटकर व क्रीडा शिक्षक कुणाल अंबेकर सर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल सर्व स्तरांतून त्यांचे कौतुक होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here